श्री. दत्त भांडार शिरोळच्या झुणका-भाकर केंद्र क्रमांक २ चा शुभारंभ

जयसिंगपूर /ता. १ -प्रतिनिधी
शिरोळ येथील श्री. दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री. दत्त भांडारच्या झुणका-भाकर केंद्राची वाढती लोकप्रियता व जयसिंगपूर शहर परिसरातील जनतेच्या मागणीवरून रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आज १ सप्टेंबर रोजी जयसिंगपूर येथील झेले चित्रमंदिर आवारातील हॉटेल रामधन येथे झुणका-भाकर केंद्र क्रमांक २ चा शुभारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील, श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, चंद्रकांत झेले, राजेंद्र झेले, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष सौ. अनिता कोळेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला.


२५ वर्षांपूर्वी सन १९९५ साली स्व. माजी आमदार, डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी शिरोळ येथील श्री दत्त भांडाराच्या प्रांगणामध्ये जनतेला अल्प दरात दर्जेदार आहार मिळावा. या उद्देशाने झुणका-भाकर केंद्र स्थापन केले होते. हे केंद्र आजही अखंडितपणे सुरू असून महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातील खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे. दर्जेदार आहारामुळे या केंद्राचा लौकिक संपूर्ण राज्यभर झाला आहे. दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राहकांचेही समाधान होऊन ग्राहक संख्या आणि व्यवहारातही वाढ झाली होती. जयसिंगपूर शहरातील जनतेकडून वारंवार झुणका भाकर केंद्र सुरू करावे. अशी मागणी होत होती. याचा विचार करून आणि रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या झुणका-भाकर केंद्र क्रमांक २ चा शुभारंभ केला आहे. ग्राहक येथील सेवेने निश्चितच समाधानी आणि आरोग्यसंपन्न राहतील, असा विश्वास उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.


प्रारंभी श्रीदत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, महाव्यवस्थापक एस. ए. घोरपडे, व्यवस्थापक पी.व्ही. कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले. दामोदर सुतार म्हणाले, जयसिंगपूर येथील हा परिसर अतिशय सुरक्षित असून स्वच्छ व पारदर्शी किचन, स्वच्छता, अद्ययावत बैठक व्यवस्था, अल्हाददायक वातावरण, विनम्र सेवक वृंद यांच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न आहे. येथे नाचणी आंबील, हुलग्याचे माडगे, दही, ताक, भाजलेले शेंगदाणे व सेंद्रिय गुळ प्लेट आदि उपलब्ध करून देऊन ग्राहकांच्या सकस आहारासंबंधी विशेष काळजी घेण्यात आली आहे. ग्राहकांनी या झुणका-भाकर केंद्रास भेट देऊन तत्पर सेवेचा लाभ घ्यावा.
यावेळी श्रीकांत कुलकर्णी व कुटुंबियांच्या वतीने गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. संजय पाटील कोथळीकर, दिलीप पाटील कोथळीकर, राजू कोळेकर, जयसिंगपूर उदगाव बँकेचे व्हाईस चेअरमन महेंद्र बागी, दत्तचे संचालक शेखर पाटील, रघुनाथ पाटील, श्रेणिक कुडचे, प्रकाश झेले, नितीन बागी, गौरव झेले, शंकर बागे, ॲड. ए. आर. चौगुले, प्राचार्य साहेबराव उमाटे, सुरेश झेले, शिवमुर्ती स्वामी, सुबराव भंडारे, सुरेश पाटील, दत्तचे मॅनेजिंग डायरेक्टर एम. व्ही. पाटील, चंद्रकांत जाधव घुणकीकर, संदीप कुलकर्णी, राजू हरळीकर, नगरसेवक सर्जेराव पवार, विशाल पाटील, शिवगोंडा पाटील, योगेश कुलकर्णी, प्रकाश गाताडे, राजू आवळेकर, अशोक निर्मळ, अमरसिंह निकम, सुभाष भोजणे, दत्त भांडायचे संचालक के.जी. गुरव, सुधाकर गुरव, सुजाता पाटील, सुभाष चौगुले, बसवेश्वर कोरे, जगदाळे, दीपक ढोणे, शहाजहान वाडकर, वसंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!