चिपरी स्मशानभूमीत दाहिनी बसवण्याची मागणी

चिपरी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीने ग्रा.पं. इमारत सुशोभिकरण, नवीन शेड मारणे, पेव्हिंग ब्लॉक, पाण्याची सोय अशा कामांचा सपाटा लावून विकासाला चालना दिली आहे. मात्र, गेल्या १० वर्षापासून स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली असून या ठिकाणी लोखंडी दाहिनी बसविण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.
चिपरी गावामध्य ग्रामपंचायतीने अनेक विकासकामे राबवून गावच्या विकासाला चालना दिली आहे. मात्र, मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतील दाहिनी अज्ञाताने चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार मागे घडला आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने लोखंडी दाहिनी बसवून ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

error: Content is protected !!