पंचगंगा घाटावर ‘एनडीआरएफ’ कडून पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक

    जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आपत्तीजन्य स्थिती निर्माण होत असते. गावात, शेतात तसेच रस्त्यांच्या बाजूला पाण्यात अडकलेल्या नागरिकांना आपत्ती पथकाकडून वाचविण्यासाठी उपाययोजना राबविल्या जातात. याच अनुषंगाने नागरिकांसह आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेत कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कोल्हापूर शहरातील पंचागंगा घाटावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) द्वारे पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी करवीर हरिश धार्मिक, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर, टीम कमांडर धर्मेद्र सेवदा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांचेसह आपदा मित्र, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नदीपात्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटींच्या माध्यमातून संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक घेतले. महापु
error: Content is protected !!