इचलकरंजी शहारासाठी मंजूर असलेल्या सुळकुड पाणी योजनेला शनिवारी स्थगिती दिली. या निर्णयाविरोधात शहारामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटतत आहेत. रविवारी युवासेना इचलकरंजी शहरातर्फे मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, समरजित पाटगे, संजय घाटगे यांच्याविरोधात शाहू महाराज चौकात बोंब मारो आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनावेळी युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी पाटील यांनी आपले मत मांडताना शाहू महाराजांचा वारसा सांगणाऱ्या आणि इचलकरंजी करांच्या हक्काचे पाणी अडवणाऱ्या कागलच्या घाटगे घराण्याचा जाहीर निषेध केला.
पाणीप्रश्नावर जर तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या काळात युवासेना सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करून पाणी प्रश्नावर वाचा फोडणार असल्याचे मत युवासेना शहरप्रमुख सागर जाधव यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये इचलकरंजी सुळकूट योजनेस स्थगिती देण्याचा निर्णय मंत्री मुफ यांच्या नेतृत्वाखाली घेतला आहे. इचलकरंजीच्या आजी-माजी आमदारांनी व खासदारांनी यावर मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेतली आहे. ही निंदनीय बाब आहे. स्थानिक आमदार, खासदारांनी यावर ठोस निर्णय न घेतल्यास त्यांच्या दारात जाऊन युवासेनेतर्फे बोंब मारो आंदोलनाचा इशारा दिला. रतन वझे, अविनाश वासुदेव, अभी लोले, रतन वाझे, कुमार धप्पधुळे, पवन मेटे, संतोष लवटे, कृष्णा इगळे, शाहरुख मुजावर, रणजित कुबडे, दीपक माने, अभिजित भोसले, किरण गंथडे, अवधूत पाटील, विश्वास सांभारे, देवराज खोत, सोहेल मुल्ला, विनायक परीट, पप्पू जागणूरे, ओंकार कोरवी, शितल मगदूम, उमेश पाटील, राजू आरगे, प्रथमेश नवरुके, ऋतिक कदम, कुमार पाटील, वैभव जाधव, सोन्या कांबळे, सयाजी चव्हाण, यांच्या सह प्रमुख पदाधिकारी युवासैनिक शिवसैनिक उपस्थित होते आदी उपस्थित होते.
