खोचीत कोरडा दिवस प्रयोग यशस्वी


खोची ता हातकणंगले येथे डेंग्यू (Dengue) साथ रोखण्यासाठी कोरडा दिवस प्रयोग खोची परिसरात यशस्वी झाला आहे. याची सवय गावातील महिलांना जडली आहे. आदल्या दिवशी पिण्याच्या तसेच वापराच्या पाण्याची तजवीज केली जात आहे. त्यामुळे सोमवारी वाहून जाणारे सांडपाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

डास, चिलटांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ लागली आहे. याबद्दल ग्रामपंचायत सरपंच अभिजित चव्हाण, उपसरपंच रोहिणी पाटील, ग्रामविकास अधिकारी आर. एस. मगदूम, सदस्य व प्रशासनाकडून ग्रामस्थांचे, विशेषतः महिलांचे आभार मानले जात आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी खोची गावात डेंग्यूच्या साथीने मोठा कहर केला. यावर प्राथमिक उपाय म्हणून सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, डास निर्मूलन, धूर फवारणी आणि कोरडा दिवस पाळण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी कोरडा दिवस पूर्ण क्षमतेने करण्यात आला. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वाहून जाणाऱ्या पाण्याचे सांडपाण्यात होणारे रूपांतर कमी होऊ लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!