आता दस्त नोंदणीचे काम होणार अटी व शर्तीवर – मुद्रांक जिल्हाधिकारी डी.आर.पाटील

कोल्हापूर दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय)

    कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज सुरु करण्यासाठी अटी, शर्तीच्या आधारे परवानगी देण्यात येत असल्याची माहिती प्र.सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी डी.आर.पाटील यांनी दिली.

 1. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये एकावेळी एका दस्ताची नोंदणी प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल.
 2. दस्त नोंदणीकरिता PDE द्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात येत आहे. कार्यालयातील डाटा एंट्री किंवा दुरुस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहेत.
 3. नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यालयासाठी eStep-in द्वारे व इतर ठिकाणी eStep-in किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर / समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित केली जाईल.
 4. नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी आरक्षित वेळेलाच कार्यालयात यावे.
 5. प्रथमता केवळ दस्त सादरक करणा-या एका पक्षकारास व वकीलास(असल्यास) कार्यालयात प्रवेश देण्यात येईल.
 6. दस्त छाननी सादरीकरण (step I व ii) झाल्यावरच इतर पक्षकारांना, admission साठी नावाचे क्रमवारीनुसार प्रवेश देण्यात येईल. एका दस्तामध्ये जास्त पक्षकार असल्यास एकावेळी जास्तीत-जास्त 4 पक्षकारांना आत प्रवेश देण्यात येईल.
 7. पक्षकारांनी admission साठी दुय्यम निबंधक /ऑपरेटर यांचेसमोर 7-7 फुट अंतरावर रांगेत थांबावे.
 8. पक्षकारांनी admission देण्यापूर्वी हात सॅनिटायझरने स्वच्छ करायचे आहे.
 9. पक्षकारांनी केवळ फोटो काढण्यापुरता मास्क चेह-यावरुन खाली घ्यावा.
 10. सह्रयासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वत:चे पेन आणणे बंधनकारण आहे,
 11. Admission झालेल्या पक्षकाराने त्वरीत बाहेर जावे.
 12. दस्त नोंदणी (step- v) झाल्यावर दस्त सादर करणा-या पक्षकाराने व वकीलाने त्वरीत बाहेर गेले नंतरच दुस-या दस्ताचे काम सुरु करण्यात येईल.
 13. त्याचबरोबर पहिल्या दस्ताचे पेजींग व स्कॅनिंग झाल्यावर दस्त सादर करणा-यास SMS मिळेल तेव्हा किंवा त्याचा नावाचा पुकारा झाल्यावर त्याने एकट्याने आते येऊन दस्त ताब्यात घेणेचा आहे.
 14. विवाह नेांदणीसाठी एकावेळी एकाच विवाहातील 2 पक्षकार व साक्षीदार यांनाच प्रवेश देण्यात येईल. इतर व्यक्तींना कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.
 15. आरोग्याच्या सुरक्षेसाठी नागरीकांना त्यांचे नाक व तोंडावर मास्क शिवाय दुय्यम निबंधक कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.
 16. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी लिव्ह अॅण्ड लायसन्स प्रकारचे दस्ताची नोंदणी (फिजीकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेश होईपर्यंत थांबविण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांना ई-रजिस्ट्रेशनचा पर्याय उपलब्ध आहे.
 17. नोटीस ऑफ इंटीमेशनचे फिजीकल फायलिंग पुढील आदेश होईपर्यंत थांबवण्यात येत आहे.
 18. कलम 57 अन्वये कार्यालयातील शोध थांबवण्यात येत आहे. यासाठी नागरिकांना ई-सर्चचा पर्याय उपलब्ध आहे.
 19. दस्ताची किंवा सुचीची प्रमाणित प्रत व मुल्यांकन अहवाल यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करणे व फी भरणे थांबवण्यात येत आहे. पक्षकारांनी या कामासाठी अर्ज करणे, फी भरणे व नक्कलेची उपलब्धता जाणुन घेणे यासाठी आपले सरकर वरील सेवेचा वापर करावा.
 20. जिल्हयातील कोणत्याही दुय्यम निबंधक यांना प्राप्त होणारे गृहभेटीच्या विनंतीचे अर्ज स्वेच्छाधिकारात नाकारता येतील.
 21. दस्त नोंदणी करताना दस्तातील लिहून देणार, लिहून घेणार, ओळखदार व साक्षीदार यांचे 48 तासाचे आतील कोरोना अहवाल निगेटीव्ह असलेबाबत अधिकृत पुरावा किंवा कोवीड लस घेतलेबाबत प्रमाणपत्र दस्ताचा भाग करुने बंधनकारक आहे.
  दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या पक्षकारांनी/नागरीकांनी वरील प्रमाणे सूचनांचे पालन करून दुय्यम निबंधक कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री.पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!