दिनविशेष ३ एप्रिल

१६८०: छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे निधन.

१९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

१९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.

१९७५: बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव्ह हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.

२०००: आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

२०१०: ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.

२०१६: पनामा पेपर्स हे कायदेशीर दस्तऐवज प्रसिद्ध होऊन सुमारे २,१४,४८८ कंपन्याची गोपनीय माहिती उगढ झाली

१९५५: सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा जन्म.

१९६२: चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य जयाप्रदा यांचा जन्म.

१९६५: पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)

१९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू निलेश कुलकर्णी यांचा जन्म.

संग्रहित माहिती

error: Content is protected !!