राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थींना धान्य वाटप -जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके

कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) 

    कोरोनाच्या corona पार्श्वभूमीवर लाभार्थीना विहीत वेळेत व पुरेसे अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील नियमित अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रति शिधापत्रिका 10 किलो तांदूळ व 25 किलो गहू व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू मोफत वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
   माहे मे 2021 करिता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अतिरिक्त अन्नधान्य अंत्योदय योजनेतील लाभार्थीना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू मोफत वाटप करण्यात येत असल्याचेही श्री. कवितके यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.


अलायंन्स हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांकडुन आर्थिक लुट -जि. प. सदस्या वंदना मगदूम ; चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासह आमरण उपोषणचा इशारा …

error: Content is protected !!