हातकणंगले, शाहूवाडी विधानसभा जिल्हाप्रमुखपदी संजय चौगुले यांची निवड

मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी हकालपट्टी

हातकणंगले / प्रतिनिधी
माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची शिवसेनेच्या (उबाठा ) जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केल्यानंतर रिक्त पदावर हातकणंगले लोकसभा मतदार संघातील हातकणंगले व शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (उबाठा ) जिल्हाप्रमुखपदी संजय धुळासाहेब चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. निवडीची घोषणा शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

हातकणंगले नुतन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांचा सत्कार करताना माजी आम . डॉ. मिणचेकर व अन्य उपस्थित मान्यवर

नुतन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या निवडीनंतर माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हातकणंगले येथील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांचा सत्कार माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार समारंभ कार्यक्रमास जि. प. चे माजी सभापती प्रवीण यादव , पं .स . चे माजी सभापती राजेश पाटील , माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण , युवती सेनेच्या सलोनी शिंत्रे , महिला आघाडीच्या सुवर्णाताई धनवडे , मालती खोपडे , युवासेनेचे अनिल माने, योगेश चव्हाण , सुनिल माने, अंकुश माने , विनोद पाटील ,संभाजी हांडे, अमोल देशपांडे , किसन तिरपणकर , विनोद पाटील , विजय भोसले गणेश भांबे , अरविंद खोत , आळतेचे माजी सरपंच संजय दिक्षीत यांच्यासह शिवसैनिक व हिंतचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भविष्यकाळात शिवसेनेमध्ये (उबाठा) कसलीही गटबाजी असणार नाही. फक्त ठाकरे हा एकच गट असेल , त्याचबरोबर सर्व नव्या – जुन्या पदाधिकाऱ्यांना व शिवसैनिकांना सोबत घेवुनच पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जातील.
संजय चौगुले, नुतन जिल्हाप्रमुख शिवसेना( उबाठा )

error: Content is protected !!