कोल्हापूर दि. 14 (जिमाका):
राज्यामध्ये कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 कलम 2 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यात दिनांक 14 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 08.00 वा. पासून ते दिनांक 01 मे 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. अखेर संचारबंदीच्या मुदतीत कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
- फौजदारी प्रक्रिया संहिता (Cr.P.C.)कलम 144 अंमलात आणणे आणि रात्र संचारबंदी लागू करणे.-
कोल्हापूर जिल्हयामध्ये दिनांक 14 एप्रिल, 2021 रोजी रात्री 8.00 वाजलेपासून दिनांक 01 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यत कलम 144 लागू करणेत येत आहे.- b) कोणत्याही नागरिकांस योग्य कारण असल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास प्रतिबंध असेल.
- c) या आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या व्यतिरिक्त सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, क्रिया, सेवा पूर्णपणे बंद राहतील.
- d) या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ असलेल्या सेवा आणि क्रिया यांना सूट देणेत आलेली असून त्यांच्या हालचाली व प्रक्रिया सुरू राहण्यास प्रतिबंध असणार नाही.
- e) या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अपवादात्मक वर्गवारीमध्ये समाविष्ठ केलेल्या सेवा आणि आस्थापना यांना कामाच्या दिवशी सकाळी 7.00 वा ते रा.8.00 वा.पर्यत या दरम्यान सुट देणेत आलेली असून त्यांच्या हालचाली व सेवा सुरू ठेवणेविषयी नमूद केलेल्या कालावधीमध्ये प्रतिबंध असणार नाही.
- f) घरेलू कामगार/ वाहन चालक / सहाय्यक (काळजी वाहक) यांना अपवादात्मक प्रकारामध्ये काम करणेसाठी समाविष्ठ करणेबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थितीनूसार स्थानिक प्राधिकरणाकडून घेणेत येईल.
- अत्यावश्यक प्रकारामध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल –
1) रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगीक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतुक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत कच्चा माल उद्योग आणि अनुषांगीक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल.
2) शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा / दवाखाने, ॲनिमल केअर सेंटर व पेट फुड शॉप
3) किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने
4) शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा
5) सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जसेकी, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.
6) विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा.
7) स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे.
8) स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा .
9) रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा
10) सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था , स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ संस्था.
11) दुरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी
12) मालाची / वस्तुंची वाहतुक.
13) पाणीपुरवठा विषयक सेवा
14) शेती संबंधित सेवा आणि शेतीशी निगडीत सर्व कामामध्ये सात्यत राहावे याबाबत शेतीकामासाठी लागणाऱ्या सर्व अनुषांगीक कृषीनिविष्ठा, बि बियाणे, खते, औजारे आणि त्यांची दुरूस्ती सेवा यांचाही समावेश असेल.
15) सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची आयात निर्यात
16) ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत )
17) मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे
18) पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा
19) सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
20) डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी -माहिती तंत्रज्ञान महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवाशी संबंधित
21) शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा
22) विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा
23) ATM’s
24) पोस्टल सेवा
25) बंदरे आणि त्या अनुषांगीक सेवा
26) कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)
27) अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग
28) पावसाळी हंगामासाठी आवश्यक वैयक्तीक व संस्थांसाठी वस्तुचे उत्पादन करणारे घटक सुरु राहतील.
29) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या इतर अत्यावश्यक सेवा.
वर नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने / अंमलबजावणी संस्था यांनी खालील सर्व समावेशक तत्वांचे पालन करणे आवश्यक राहील.
1) सर्व अंमलबजावणी करणारे अधिकारी / प्राधिकरण यांनी या आदेशान्वये लागू केलेले प्रतिबंध हे लोकांच्या हालचालीशी संबंधित असून, वस्तु आणि मालाच्या वाहतुकीशी नाहीत या तत्वांची नोंद घेणेत यावी.
2) या आदेशात नमूद केलेल्या सेवा देणाऱ्या कामगारांच्या हालचाली या आदेशात 1-b मध्ये नमूद केलेनूसार वैध राहतील.
3) अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळकाळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवेमध्ये गणल्या जातील. महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक सेवा या अत्यावश्यक सेवा समजल्या जातील हे तत्व लक्षात ठेवावे. (Essential for essential is essessntial)
- या आदेशात नमूद केलेनूसार अत्यावश्यक सेवामध्ये समाविष्ठ सर्व दुकाने यांनी खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. –
a) अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानाच्या ठिकाणी दुकान मालक व दुकानामध्ये काम करणारे सर्व कामगार वर्ग तसेच सर्व ग्राहक यांनी संबंधित दुकान परिसरामध्ये कोव्हीड प्रतिबंधात्मक वतर्णुकीचे पालन करणे बंधनकारक असेल.
b) आवश्यक सेवा देणाऱ्या दुकांनाचे मालक, त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग यांचे भारत सरकारकडील निकषानूसार लवकारत लवकर लसीकरण करून घेणेत यावे. सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकानामध्ये ग्राहकांशी संवाद साधताना सुरक्षा उपायांचे जसे की, पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय जसे की, फेसशिल्ड व ग्राहकांकडून ई पेमेंटद्वारेच रक्कम स्विकारणे इत्यादीचे पालन करणेत यावे.
c) अत्यावश्यक सेवामध्ये काम करणारे दुकानमालक, कामगार वर्ग किंवा कोणताही ग्राहक कोव्हीड उपाययोजनांचे पालन करत नसल्याचे निर्दशनास आल्यास त्यांचेकडून रक्कम रुपये 500/- दंड वसूल केला जाईल. तसेच दुकान आस्थापना यांचेकडून कोव्हीड उपाययोजनांचे भंग झालेस दुकान आस्थापनेकडून रक्कम रुपये 1000/- दंड वसूल केला जाईल. पुन्हा – पुन्हा नियमांचे भंग करत असल्याचे निर्दशनास आल्यास संबंधित आस्थापना ही कोव्हीड -19 आपत्ती अधिसूचना संपेपर्यत बंद करणेत येईल.
d) अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ असलेल्या आस्थापनामध्ये सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या हालचाली या आदेशात 1-b मध्ये नमूद केलेनूसार वैध राहतील.
e) या आदेशातील 2(3) मध्ये नमूद केलेनूसार किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने एकत्रित असलेल्या ठिकाणी मोठया प्रमाणात लोक एकत्र येत आहेत अशा ठिकाणाबाबत स्थानिक प्रशासनाने योग्य ती अनुषांगीक उपाययोजना करून तसेच त्यांच्या चालू राहणेच्या वेळा निश्चित करून देणे. कायमस्वरूपी त्या ठिकाणी नसलेल्या वरील सेवाबाबत खुल्या सार्वजनिक जागा शोधून त्या ठिकाणी त्यांना सेवा देणेबाबत जागा नेमून देता येतील. स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा ची ठिकाणे ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत होणार नाहीत, याबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. स्थानिक प्रशासनास आवश्यकता भासल्यास वरील सेवाबाबत काही सार्वजनिक ठिकाणे ही कायमस्वरूपी बंद करता येतील.
f) या आदेशाने बंद करणेत आलेली सर्व दुकाने / आस्थापना यामध्ये काम करणारे सर्व कामगारांचे भारत सरकारकडील निकषानूसार लवकरात लवकर लसीकरण करून घेणेत यावे. तसेच दुकान मालकांने दुकानामध्ये ग्राहकांशी संवाद साधणेसाठी सुरक्षा उपायांचे जसेकी, पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाईन पेंमेंट इत्यादीचे पुर्वतयारी करणेत यावी, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, सदर दुकाने पुन्हा सुरू करणेबाबत शासनास निर्णय घेणे सोईस्कर होईल. - सार्वजनिक वाहतुक व्यवस्था –
सार्वजनिक वाहतुक व्यवस्था खालील निर्बधांचे पालन करत, पूर्ण क्षमतेने सुरू राहील.
ऑटो रिक्षा चालक + फक्त 2 प्रवासी
टॅक्सी ( चारचाकी वाहन) चालक + वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50 % (प्रादेशिक परिवहन विभागाकडील नियमानूसार )
बस प्रादेशिक परिवहन विभागाकडील नियमानूसार सर्व बसण्याच्या जागा असतील इतके प्रवासी .
कोणत्याही परिस्थितीत उभा राहून प्रवास करणेस प्रवाशांना परवानगी असणार नाही.
a) सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी काटेकोरपणे योग्य पध्दतीने मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लघंन करणारे प्रवासी रक्कम रुपये 500/- दंडास पात्र राहतील.
(४)
b) चारचाकी टॅक्सी मध्ये जर एखाद्या प्रवाशांने मास्क वापरला नसेल, नियमांचे उल्लघन करणारा तो प्रवासी आणि चालक हे प्रत्येकी रक्कम रूपये 500/- दंडास पात्र राहतील.
c) प्रत्येक वेळी प्रवास पुर्ण करून आलेल्या वाहनांचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक राहील.
d) सर्व सार्वजनिक वाहुतक व्यवस्थेमधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे भारत सरकारकडील निकषानूसार लवकरात लवकर लसीकरण करणेत यावे आणि कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना वाहनांमध्ये प्रर्दशित करणे. रिक्षा आणि टॅक्सीच्या चालकाला प्लास्टिक शिटच्या माध्यमातून स्वता:चे विलगिकरण करणेबाबत प्रवृत्त करावे.
e) सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेशी निगडीत कर्मचारी वर्गाच्या हालचाली या आदेशामध्ये 1-ब मध्ये नमूद केलेनूसार (कोणत्याही नागरिकांस सार्वजनिक ठिकाणी योग्य कारण असल्याशिवाय फिरण्यास प्रतिबंध असेल) वैध राहतील.
f) रेल्वेबाबत, रेल्वे प्रशासनाकडून प्रवासादरम्यान कोणताही प्रवासी रेल्वेच्या सामान्य डब्यामधून उभा राहून प्रवास करणार नाहीत, आणि सर्व प्रवासी मास्क वापरतील याची खात्री करावी.
g) रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मास्क न वापरणे, कोव्हीड उपाययोजनांचे पालन न केलेस रक्कम रुपये 500/- दंड आकारला जाईल.
h) सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरू ठेवणेबाबत यापूर्वी काही अटीवर परवानगी देणेत आलेली आहे. सदरबाबत सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरळीत राहणेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या वाहतुक व्यवस्थेशी निगडीत अनुषांगिक सेवा यांचाही यामध्ये समावेश करणेत येत आहे. विमानतळावर आवश्यक असलेल्या मालवाहतुक, तिकिट व्यवस्था या अनुषांगीक सेवांचाही यामध्ये समावेश असेल.
i) ज्या व्यक्ती रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असतील, त्यांना अधिकृत तिकिट स्वत: जवळ बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत विमानतळ / बसस्थानक / रेल्वे स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल. - सुट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना –
a) कार्यालये :
खालील नमूद कार्यालये ही सूट देणेत आलेल्या वर्गवारीमध्ये समाविष्ठ असतील.
i) केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व संविधानीक प्राधिकरणे व संस्था
ii) सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बॅका, सार्वजनिक उपक्रम
iii) अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची सर्व कार्यालये
iv) विमा आणि मेडीक्लेम कार्यालये
v) औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालये जी, उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत.
vi) रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया यांचेमार्फत नियंत्रित स्वंतत्र कार्यकक्ष असलेले प्राथमिक वितरक, CCIL, NPCI, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आणि RBI कडून नियंत्रित बाजारामध्ये समाविष्ठ असलेले सर्व आर्थिक बाजार
vii) सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे
viii) सर्व मायक्रो फायनान्स संस्था
ix) मा. न्यायालय, मा. लवाद अथवा चौकशी आयोगाचे कामकाज सुरु असलेस त्यांचेशी संबंधित सर्व अधिवक्ता / वकिल यांची कार्यालये सुरु राहतील.
• वर नमूद कार्यालये ही आवश्यक असलेला कमीत कमी कर्मचारी वर्ग किंवा क्षमतेच्या 50 % पर्यत कर्मचारी उपस्थित राहून सुरू राहतील. पंरतू कोव्हीड -19 आपत्तीमध्ये कामकाज करत असलेली सर्व शासकीय कार्यालये / सेवा या बाबीमधून वगळणेत आलेल्या आहेत.
• या कार्यालयामध्ये हजर राहणेसाठी जाणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या हालचाली या आदेशामध्ये 1-b मध्ये नमूद केलेनूसार वैध राहतील.
• स्थानिक आपत्ती प्राधिकरण आवश्यकते प्रमाणे इतर कार्यालये यामध्ये समाविष्ठ करतील.
• अभ्यागताना सदर कार्यालयामध्ये प्रवेश प्रतिबंधित असेल आणि कार्यालय परिसरामध्ये असलेल्या कर्मचारी / अधिकारी यांच्याव्यतिरिक्त इतरांच्या उपस्थितीत घ्यावयाच्या सर्व बैठका या ऑनलाईन पध्दतीने घेणेत येतील.
• सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे भारत सरकारकडील निकषानूसार लवकरात लवकर लसीकरण करून घेणेत यावे. जेणेकरून शासनाकडून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, सदर सर्व शासकीय / खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करणेबाबत तात्काळ निर्णय घेणे सोईस्कर होईल.
b) खाजगी वाहतुक व्यवस्था –
• खाजगी वाहने तसेच खाजगी बस सेवा या अत्यावश्यक सेवेसाठी तसेच या आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणासाठी सुरू राहतील
(५)
• नियमांचे उल्लघन करणारा व्यक्ती रक्कम रूपये 1000/- दंडास पात्र राहतील.
• खाजगी बस सेवेबाबत खालील निर्बंध लागू असतील.
i) खाजगी बसेस मधून बसणेच्या क्षमते इतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. एकाही प्रवाशाला उभा राहून प्रवास करणेस परवानगी असणार नाही.
ii) सर्व खाजगी वाहुतक व्यवस्थेमधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे भारत सरकारकडील निकषानूसार लसीकरण करणेत यावे आणि त्यांनी कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक वतर्णुकीचे पालन करणे बंधनकारक असेल.
c) रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल्स विषयक –
a) सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार हे बाहेरील व्यक्तीसाठी आतमध्ये बसून सेवा देणेस बंद राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंट आवारामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत प्रवाशांसाठी रेस्टॉरंट आणि बार सेवा सुरू राहतील.
b) हॉटेल, रेस्टॉरंट साठी फक्त घरपोच सेवा सुरू राहतील. कोणासही हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मध्ये सेवा घेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही.
c) हॉटेल मध्ये असलेले रेस्टॉरंट आणि बार हे हॉटेल अंतर्गत वास्तव्यास असलेल्या प्रवाशांसाठी / पाहुण्यांसाठी सुरू राहील. कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेरच्या प्रवाशांसाठी हॉटेल सेवा देता येणार नाही. बाहेरील लोकांनी हॉटेल व रेंस्टॉरंटसाठी वर नमूद केलेनूसार प्रतिबंधाचे पालन करावे लागेल. या आदेशामध्ये नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा अथवा सुट देणेत आलेल्या सेवा बजावणेसाठी हॉटेलमध्ये राहणेस असलेल्या व्यक्तींनी हालचाल करणे वैध असेल.
d) घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे भारत सरकारकडील निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे,
e) एकापेक्षा जास्त कुटूंबे राहणाऱ्या इमारतीमध्ये घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचारी वर्गाची हालचाल प्रवेशव्दारा पर्यत नियंत्रित असेल आणि आतील सेवा संबंधित इमारतीत नियुक्त केलेल्या संबंधित कर्मचारी वर्गामार्फत पोहोच केल्या जातील. याअनुषंगाने सर्व घरपोच सेवा देणारा कर्मचारी वर्ग आणि इमारतीमधील कर्मचारी वर्ग यांनी शिस्तप्रिय आणि कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक वतर्णुकीचे पालन करणे आवश्यक असेल.
f) सदर नियमाचा भंग करणारी व्यक्ती याबद्दल रक्कम रुपये 1000/- दंडास पात्र राहील आणि संबंधित आस्थापनेकडून रक्कम रूपये 10,000/- दंड आकारला जाईल. वारंवार या सुचनेचा भंग केल्यास वा असे कृत्य वारंवार घडल्यास सदर आस्थापनेचा परवाना आणि सदर प्रक्रियेबाबत देणे आलेली परवानगी कोव्हिड-19 साथीची अधिसूचना आहे तो पर्यंत रद्द करण्यात येईल.
g) भारत सरकारकडील निकषाप्रमाणे सर्व रेस्टॉरंट आणि बार आस्थापनामध्ये काम करणारे व्यक्ती / कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास रेस्टॉरंट आणि बार सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
d) उत्पादन क्षेत्र –
a) खालील उत्पादन क्षेत्रे ही कार्यरत राहतील किंवा वेगवेगळया शिफटमध्ये आवश्यकतेनूसार कार्यरत राहतील.
i) या आदेशामध्ये नमूद अत्यावश्यक सेवासाठी आवश्यक असलेली उत्पादनांची औद्येागिक घटक पुर्ण क्षमतेने सुरु राहतील.
ii) निर्यात मागणी पुर्ण करणेसाठी आवश्यक निर्यात विषयक उत्पादन पुरवठा करणारे सर्व उद्योग सुरु राहतील.
iii) तात्काळ बंद न करता येणारे आणि तात्काळ मर्यादित वेळेमध्ये सुरु न करता येणारी प्रक्रिया असलेले सर्व उद्योग 50% क्षमतेने सुरु राहतील. उद्योग विभाग, कोल्हापूर जिल्हा यांचेकडून वर नमूद कोणताही उद्योग संबंधित नियमाचे भंग करीत नसलेबाबत आणि, कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करत असलेबाबत तपासणी करतील. सदर उद्योग हे मोठया प्रमाणात ऑक्सिजनचा वापर करणारे नसावेत, जे की फक्त अत्यावश्यक सेवा संबंधित उत्पादन करणारे असावेत. त्याचबरोबर संबंधित उद्योगानी त्याच्या कामगाराची राहणेची व्यवस्था संबंधित उद्योग परिसरामध्ये करावी. किंवा कामगार बाहेर राहात असतील तर त्यांची हालचाल स्वतंत्र वाहनातून होईल जेणेकरुन या कामगाराचा इतर नागरीकाशी संपर्क येणार नाही.
b) वरील सर्व उद्योगानी त्यांचे कामगारासाठी राहणेची सुविधा कामाचे ठिकाणी उपलब्ध करणे किंवा स्वतंत्र अलगीकरण असलेल्या ठिकाणी करावी जेणेकरुन कामगाराच्या हालचाली या कोणाशी ही संपर्क न येता होतील. बाहेरुन येणा-या मध्ये फक्त 10% व्यवस्थापकीय कर्मचारी काम करू शकतात. सदर आधिसुचना संपेपर्यत कामगाराना कामाच्या ठिकाणाच्या क्षेत्राबाहेर हालचाली करता येणार नाहीत. सदर उद्योग हे त्यांना आवश्यक असलेल्या शिफट मध्ये सुरु राहतील.
c) उद्योगामध्ये कार्यरत व्यवस्थापकीय व इतर कार्यरत कर्मचारी अधिकारी यांचे भारत सरकारकडील निकषानूसार लवकरात लवकर लसीकरण करणेत यावे. जर हे उद्योग भारत सरकारच्या कार्यस्थळ लसीकरण अटीत बसत असतील तर त्यांना लसीकरणाची व्यवस्था करावी लागेल.
(६)
d) वरील अटीवर सुरु असलेले कारखाने आणि उत्पादक उदयोग यांनी खालील नमूद शिस्तीचे पालन करणे आवश्यक राहिल.
i) सर्व कामगारांचे कामाच्या ठिकणी प्रवेश देण्याअगोदर शरीराराचे तापमान तपासावे आणि त्यांचेकडून कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन केले जात आहे हे तपासावे.
ii) जर एखादा कामगार किंवा कर्मचारी वर्ग कोविड 19 पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या संपर्कातील सर्व कामगारांचे कारखाना प्रशासनाने स्वखर्चाने अलगीकरण करावे.
iii) 500 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखाना किंवा उदयोगाच्या ठिकाणी त्यांनी स्वत:चे अलगीकरण केंद्र तयार करावे. सदर केंद्रावर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध उपलब्ध करुन देण्यात याव्यात आणि जर सदर अलगीरण केंद्र हे कारखाना परिसराच्या बाहेर असल्यास बाधित व्यक्तींची ने-आण करताना ते इतर नागरिकांच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घेणे.
iv) जर एखादा कामगार कोविड 19 पॉझिटिव्ह आल्यास सदर कारखाना युनिट पूर्ण निर्जंतुक करेपर्यंत बंद करण्यात येईल.
v) गर्दी टाळण्यासाठी दुपारचे जेवण आणि चहाच्या वेळा वेगवेगळया देण्यात येतील. तसेच खाण्याचे एकत्र ठिकाण बंद करावे.
vi) सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करणेत यावे
e) जर एखादा कामगार कोव्हीड सकारात्मक आल्यास त्याला वैद्यकीय रजा देणेत यावी व त्याला कामावर गैरहजर या कारणास्तव कामावरुन कमी करता येणार नाही. सदर कामगार यांस पूर्ण पगारी वेतन देणेत यावे.
f) या आदेशानूसार परवानगी न देणेत आलेल्या सर्व कारखाने आणि उद्योग यांनी त्यांचे कामाकाज सदर आदेशाची मुदत संपेपर्यत तात्काळ बंद करावे. या संदर्भात काही शंका असल्यास उद्योग विभाग यांचेशी संपर्क करावा.
e) रस्त्याच्या बाजूचे खाद्यपदार्थ विक्रेते –
• खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना त्याच ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास देवू नयेत – फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी 07.00 वा ते रात्री 08.00 वा. यावेळेत सर्व दिवशी सुरु ठेवाव्यात. सदर हालचाली या आदेशात १-b मध्ये नमुद केले नुसार वैध राहतील.
• प्रतिक्षाधीन ग्राहकांना काऊंटर पासून दूर अंतरावर सामाजिक अंतर राखून उभे करावे.
• ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यानी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे.
• स्थानिक प्रशासनाने / स्थानिक स्वराज्य संस्थेने सदर विक्रेत्यांवर प्रत्यक्ष किंवा सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवावे. जे विक्रेते आणि ग्राहक सदर कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयक नियमांचे उल्लंघन करतील, ते ग्राहक व विक्रेते रक्कम रुपये 500/- दंडाच्या कारवाईस पात्र राहतील.
• सदर नियमांचा भंग करणारे विक्रेते यांची दुकाने कोविड-19 साथ रोग असे पर्यंत बंद राहतील.
• जर विक्रते पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन करत असलेची स्थानिक प्रशासनाची खात्री झालेस व सदर विक्रते दंड करुनही नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांचेवर निलंबनाची किंवा साथरोग आटोक्यात येई पर्यंत तात्पुरते किंवा कायम स्वरुपी बंद ठेवणेची कारवाई करणेत यावी.
f) वृत्तपत्रे / मासिके / नियतकालिके :
• वृत्तपत्रे / मासिके / नियतकालिके छपाई व वितरण.
• फक्त घरपोच सेवा सुरु राहील.
• या सेवेशी संबंधीत सर्व कर्मचाऱ्यांचे भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे.
६) मनोरंजन, करमणूक, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स वगैरे विषयक –
सदर आदेशातील मुद्द क्र. 1 बाबत कोणताही पुर्वग्रह न ठेवता असे जाहिर करणेत येते की –
a) सिनेमा हॉल बंद राहतील.
b) नाटयगृहे आणि प्रेक्षागृहे बंद राहतील.
c) मंनोरंजन पार्क/ आर्केडस्/ व्हिडीओ गेम्स पार्लर्स बंद राहतील.
d) वॉटर पार्क बंद राहतील.
e) क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रिडा संकुले बंद राहतील.
f) वरील आस्थापनाशी निगडीत व्यक्ती / कामगार वर्ग या सर्वांचे भारत सरकारकडील निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास या आस्थापना पुन्हा सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
g) चित्रपट / मालिका / जाहिराती यांचे चित्रीकरण बंद राहील.
h) ज्या दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स मधून अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविल्या जात नाहीत ती बंद राहतील.
(७)
i) सर्व सार्वजनिक ठिकाणे जसे की, बगिचे, खुल्या जागा इ. ठिकाणे बंद राहतील. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी वर नमुद वापर सुरु असलेस स्थानिक प्रशासन त्याचा वापर सुरु ठेवणेबाबत या आदेशाच्या अंमलबजावणीपर्यंत निर्णय घेतील. .
७) धार्मिक / प्रार्थना स्थळे –
a) सर्व धर्मिय धार्मिक / प्रार्थना स्थळे बंद राहतील.
b) सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक आणि धार्मिक सेवा करता येतील. परंतू यावेळी कोणत्याही अभ्यागतांस / भक्तांस प्रवेश असणार नाही.
c) धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये सेवा देणारे सेवेकरी यांचे भारत सरकारकडील निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास धार्मिक / प्रार्थना स्थळे सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
8) केशकर्तनालय दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लरस –
a) सर्व केशकर्तनालय दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लरस बंद राहतील.
b) भारत सरकारकडील निकषाप्रमाणे सर्व केशकर्तनालय दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लरस मधील कामगार वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास सर्व केशकर्तनालये दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लरस पुन्हा सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
९) शाळा आणि महाविद्यालये –
a) सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.
b) वरील नियमामधून 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना सूट असेल. परीक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणे किंवा 48 तासापर्यत वैध असलेले कोरोनाचे –Ve RTPCR/RAT/TruNAT/CBNAAT Test प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील.
c) महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परिक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणाकडून कोल्हापूर जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी कोणताही त्रास होऊ न देता, स्थानिक आपत्ती प्राधिकरणास पुर्व सुचना देवून परीक्षा घेता येतील.
d) ज्या विद्यार्थ्यांना ऑफ लाईन परिक्षा द्यावयाची आहे त्यांच्या सोबत एक प्रौढ व्यक्तीस प्रवास करणेस परवानगी असेल. सदर प्रवासावेळी विद्यार्थांने संबंधीत परीक्षेचे प्रवेश पत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.
e) सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील.
f) अशा प्रकारच्या आस्थापनेतील सर्व कर्मचारी यांनी भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे जेणेकरुन पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय घेणे सोईचे होईल.
१०) धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम –
a) कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांना परवानगी असणार नाही.
b) ज्या जिल्हयामध्ये निवडणूका प्रस्तावित असतील, त्या ठिकाणी राजकीय सभा / मेळावे घेण्यास खालील अटी व शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी यांचेकडून परवानगी देणेत येईल.
a. जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेले संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनूसार संबंधित राजकीय मेळावे / सभा यांना बंदिस्त सभागृहासाठी 200 पेक्षा जास्त नाही किंवा सभागृहाच्या बैठक क्षमतेच्या 50 % चे अधीन राहून आणि खुल्या ठिकाणच्या क्षमतेच्या 50 % या पेक्षा कमी क्षमतेच्या अधिन राहून सर्व कोव्हीड -19 शिष्टाचाराचे पालन करणेच्या अटीवर परवानगी देणेबाबतची कार्यवाही करावी.
b. संबंधित परवानगी देणेत आलेल्या राजकीय सभा / मेळावे संबंधित क्षेत्राचे त्या त्या स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा नेमलेल्या अधिकारी यांचेमार्फत योग्य नियमांचे पालन केले जात असलेची खात्री केली जाईल.
c. सदर ठिकाणी कोव्हीड -19 शिष्टाचाराचे उल्लंघन झालेस संबंधित ठिकाणचा जागा मालक हा यासाठी जबाबदार राहील आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नूसार दंडास पात्र राहील. गंभीर प्रकारचे उल्लंघन झाल्यास सदर ठिकाण हे कोव्हीड -19 साथ संपेपर्यत बंद करण्यात येईल.
d. एखाद्या उमेदवारांच्या दोन पेक्षा जास्त राजकीय सभा आणि मेळाव्यामध्ये सदर बाबींचे उल्लंघन झालेस, पुन्हा सदर उमेदवाराच्या राजकीय सभा / मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही.
e. कोणत्याही प्रकारच्या मिरवणूका, कोपरा सभा या ठिकाणी कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक असेल.
f. वरील सर्व मार्गदर्शक सूचना या निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वासाठी समान राहतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत, याविषयी दक्षता घेणे.
g. मतदानाच्या दिवशी रात्री 08.00 वा. पासून सदर आदेशातील इतर सर्व तरतुदी मतदान झालेल्या क्षेत्रासाठी संपूर्णपणे अंमलात येतील.
(८)
c) लग्नसमारंभाला जास्तीत जास्त 25 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल.
a. लग्नसमारभांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी सेवा देणाऱ्या सर्व कामगार वर्गाचे लसीकरण करणे बंधनकारक असेल आणि जोपर्यत लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यत वैध – Ve RTPCR/RAT/TruNAT/CBNAAT Test प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
b. – Ve RTPCR/RAT/TruNAT/CBNAAT Test प्रमाणपत्र व लसीकरण केलेले नाही अशा सेवा देणारा व्यक्ती निर्दशर्नास आल्यास त्यास रक्कम रूपये 1000/- दंड आकारला जाईल आणि संबंधित आस्थापना मालकास रक्कम रूपये 10,000/- दंड आकारला जाईल.
c. लग्नसमारंभ आयोजित केले जात असलेल्या हॉलच्या परिसरामध्ये पुन्हा पुन्हा उल्लघंन झालेस सदर परिसर हा सिल केला जाईल, तसेच सदर ठिकाणी दिलेली परवानगी कोव्हीड -19 साथीची अधिसचूना संपेपर्यत रद्द केली जाईल.
d. धार्मिक ठिकाणी लग्नसमारंभ आयोजित करणेस वरील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल.
d) अंत्ययात्रेसाठी / अंतविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना परवानगी असेल. सदर अंत्यविधी चे ठिकाणी असणाऱ्या कर्मचारी वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण करावे. सदर कर्मचाऱ्यांस वैध – Ve RTPCR/RAT/TruNAT/CBNAAT Test प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. प्रार्थनास्थळे याठिकाणी आयोजीत अंतविधी यामध्ये वरील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असेल.
11) ऑक्सिजन उत्पादन –
A) कोणत्याही औद्योगिक आस्थापनांना ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरता येणार नाही. परंतू अत्यावश्यक उपक्रमातील प्रक्रियेसाठी किंवा अपवादात्मक परिस्थितीत आवश्यक कारणांची नोंद करुन विकास आयुक्त यांचेकडून सदर प्रक्रियेस परवानगी देणेत येईल.
B) सर्व ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्याकडे असणारा ऑक्सिजन साठा हा वैद्यकीय व औषध निर्माणासाठीच 100% राखीव ठेवणेचा आहे. दिनांक 10 एप्रिल 2021 पासून त्यांनी त्यांचे ग्राहकांना पुरवठा केलेल्या ऑक्सिजनचा व त्यांच्या अंतिमत: उपयोगाबाबत ग्राहकांच्या नावासह घोषणापत्र जारी करावे लागेल.
12) ई-कॉमर्स –
a) ई-कॉमर्स सेवेद्वारे फक्त मुद्दा क्र. 2 मध्ये उल्लेख केलेल्या फक्त अत्यावश्यक वस्तूंचीच घरपोहोच सेवा सुरु ठेवणेत यावी.
b) ई-कॉमर्स सेवेद्वारे घर पोहोच सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे. आणि जर संबंधीत संस्था कामाच्या ठिकाणी लसीकरण करणेविषयीच्या भारत सरकारच्या निकषामध्ये येत असेल तर त्या संस्थेने लसीकरणे शिबिर आयोजित करणे अनिवार्य आहे. जे कर्मचारी घरपोच सेवा देत नाहीत किंवा अशा सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येत नाहीत अशा कर्मचाऱ्यांनी, संस्थांशी संबंधीत नियम क्र. ५ चे अनुकरण करावे.
c) वर नमूद कार्यालये ही आवश्यक असलेला कमीत कमी कर्मचारी वर्ग किंवा क्षमतेच्या 50 % पर्यत कर्मचारी उपस्थित
राहून सुरू राहतील.
d) या कार्यालयामध्ये हजर राहणेसाठी जाणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या हालचाली या आदेशामध्ये 1-ब मध्ये नमूद केलेनूसार (कोणत्याही नागरिकांस सार्वजनिक ठिकाणी योग्य कारण असल्याशिवाय फिरण्यास प्रतिबंध असेल) वैध राहतील.
13) सहकारी गृह निर्माण संस्था –
a) कोणत्याही सहकारी गृह निर्माण संस्थेत एका वेळी पाच कोरोना सकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्ती आढळल्यास सदर सहकारी गृह निर्माण संस्था सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल. सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्रासाठी निर्ममित करणेत आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणेत यावे.
b) अशा गृह निर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या प्रवेशद्वारावर अभ्यागतांना प्रवेश बंदी असलेबाबतचा फलक लावणे बंधन कारक असेल.
c) सोसायटीमध्ये तयार करणेत आलेल्या सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये कोणत्याही नागरिकांचा प्रवेश व बाहेर जाणे याबाबत सोसायटीमार्फत निरीक्षण व प्रतिबंध करणेचा आहे.
d) जर एखाद्या गृह निर्माण संस्थेने उक्त नमुद निर्देशांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस रक्कम रुपये 10000/- दंड करणेत येईल व दुसऱ्या वेळेस त्यापेक्षा जास्त दंड तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळोवेळी ठरविले प्रमाणे आकारणेत येईल.
सदर आकारणेत आलेल्या दंडाच्या रक्कमेचा वापर हा सोसायटीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे पालन करणेसाठी नेमणेत आलेल्या कामगारांच्या पगारासाठी करणेत येईल.
e) सर्व सहकारी गृह निर्माण संस्थानी त्यांच्या संस्थेत दररोज येणाऱ्या व्यक्तींची ते जोपर्यंत लस घेत नाहीत तोपर्यंत आरटीपीसीआर/रॅट/ट्रू नॅट/ सीबीनॅट चाचणी शासकीय निर्देशानुसार करावी.
१४) बांधकाम विषयक क्रिया –
a) ज्या बांधकाम क्षेत्रात बांधकामाशी संबंधीत कर्मचारी / मजूर यांना त्याच ठिकाणी राहणेची सोय आहे अशा बांधकाम व्यवसायास परवानगी असेल. संबंधीत कामगारांना बाहेर फिरणेस प्रतिबंध असुन, केवळ साहित्याची वाहतूक करणेस मुभा असेल.
(९)
b) सदर ठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करुन घ्यावे आणि संबंधीत संस्थांनी भारत सरकारच्या निकषानुसार कामाच्या ठिकाणी तात्काळ लसीकरणाची व्यवस्था करावी.
c) नियमांचे भंग करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांस रक्कम रुपये 10,000/- दंड आकारणेत येईल. तसेच पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लघन झालेस सदर बांधकामाचे ठिकाण हे कोव्हीड -19 संसर्ग कमी होत नाही, तोपर्यत बंद करणेत येईल.
d) एखादा कामगार हा कोव्हीड -19 + Ve आढळून आल्यास त्याला वैद्यकीय रजा मंजूर करणेत यावी. त्याला कामावर गैरहजर या कारणास्तव कामावरुन कमी करता येणार नाही. सदर कामगार यांस पूर्ण पगारी वेतन देणेत यावे.
e) बांधकामाच्या किंवा नागरिकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने मान्सुनपुर्व खबरदारी म्हणून बांधकामे करणे अत्यावश्यक आहे अशा मान्सुनपुर्व बांधकामास स्थानिक प्राधिकरण परवानगी देईल.
15) दंडनिय कारवाई –
जमा होणाऱ्या दंडाची रक्कम संबंधीत आपत्ती व्यवस्थान प्राधिकारणाकडे देणेत येईल. सदर प्राप्त होणारी दंडाची सर्व रक्कम ही कोव्हीड -19 विरुध्दच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि उपचारांशी संबंधीत बाबींसाठी वापरली जाईल.
सदरचा आदेश हा दिनांक 01 मे, 2021 रोजी सकाळी 07.00 वाजेपर्यंत कोविड-19 साथ रोग नियंत्रण करणेकामी अंमलात राहील. सदरचा आदेश हा यापूर्वी उपरोक्त वाचले मध्ये नमुद करणेत आलेले व निर्गमित करणेत आलेले आदेश, स्पष्टीकरण, सुधारित आदेश यांचे जागी निर्गमित करणेत येत आहे. या आदेशामध्ये एखादा मुद्दा नमुद नसलेस यापूर्वी निर्गमित करणेत आलेल्या आदेशातील मुद्दा लागू राहील.
या आदशामध्ये नमुद केलेल्या नियमना संबंधी किंवा प्रतिबंधासाठी अधिक स्पष्टीकरण वाचले क्र. 9 मधील आदेशाप्रमाणे अंतिम राहील.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
(जिल्हा माहिती कार्यालय)