सर फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

इचलकरंजी / प्रतिनिधी

     महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित असणाऱ्या सर फाउंडेशनच्या कोल्हापूर शाखेकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल काल जाहीर झाला. प्राथमिक विभागातून शुभांगी शंकरराव मेथे पाटील (विद्या मंदिर निगवे दुमाला तालुका करवीर) प्रथम क्रमांक , हर्षल रामचंद्र जाधव (विद्या मंदिर हुंबे वाडा तालुका राधानगरी) द्वितीय क्रमांक, वैशाली संभाजी बोरचाटे (शाहू विद्यामंदिर चिपरी तालुका शिरोळ) व युवराज रघुनाथ पाटील (विद्या मंदिर येवती तालुका करवीर) विभागुण तृतीय क्रमांक संपादन केला . तसेच प्राची केतन कुलकर्णी (डेक्कन इंग्लिश स्कूल इचलकरंजी) व रागिणी म्हाडगोंडा पाटील (कुमार विद्यामंदिर कुरुंदवाड) उत्तेजनार्थ प्रथम , नीलोफर गुलाब अत्तार(लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर क्रमांक 71 करवीर) उत्तेजनार्थ द्वितीय, सौ गीतांजली सचिन खोत (विद्या मंदिर बेलवळे खुर्द तालुका कागल) अशी उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.

   माध्यमिक विभागात सौ स्मिता अरुण आवळे (चंद्रकांत घुगरदरे प्रशाला नातेपुते जिल्हा सोलापूर) प्रथम क्रमांक असे घवघवीत यश संपादन केले. या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन वर्षा निशाणदार व रंजिता काळेबेरे जिल्हा समन्वयक सर फाउंडेशन कोल्हापूर यांनी केले. या उपक्रमबद्दल सर फाउंडेशन महाराष्ट्र चे राज्य समन्वयक श्री सिद्धाराम माशाळे, श्री बाळासाहेब वाघ, सौ हेमा शिंदे वाघ, , श्री राजकिरण चव्हाण यांनी संयोजकांचे विशेष कौतुक केले व विजेत्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!