डीकेटीई मध्ये रॅपिड अँटीजेन टेस्टचा शुभारंभ ; आम . प्रकाश आवाडे यांचा पाठपुरावा यशस्वी

इचलकरंजी/ता .१८-प्रतिनिधी

       शहर आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाचे तातडीने निदान होऊन उपचारही लवकर मिळावेत . यासाठी येथील डीकेटीईच्या वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्येही आता रॅपिड अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या रॅपिड अँटीजेन टेस्टचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार प्रकाश आवाडे यांनी या प्रश्‍नी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.
         मागील दोन महिन्यांपासून शहर आणि परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. स्त्राव तपासणीचा अहवाल येण्यास विलंब होत असल्याने तसेच खाजगी रुग्णालये वा लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी शुल्क आकारले जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. कोरोना चाचणी मोफत उपलब्ध व्हावी . यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून शासनाच्यावतीने येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रॅपिड अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ या दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी हे रुग्णालय महत्वाचे असल्याने याठिकाणीही गर्दी होऊ लागल्याने आयजीएम रुग्णालयावर ताण वाढला होता. त्यामुळे आणखीन गरज ओळखून आमदार प्रकाश आवाडे आणि जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करुन डीकेटीई कोविड केअर सेंटरसह अन्य केअर सेंटरमध्ये तातडीने रॅपिड अँटीजेन सुविधा उपलब्ध देण्याची मागणी केली होती. त्याला यश मिळाले असून डीकेटीई कोविड केअर सेंटरमधील सुविधेमुळे आयजीएम रुग्णालयावर पडणारा ताण कमी होण्यासह कोरोनाचे निदान लवकर होऊन बाधितांना उपचारही तातडीने मिळणार आहेत.
          डीकेटीई कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट सुविधेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्याधिकारी दीपक पाटील, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, नगरसेवक सुनिल पाटील, केअर सेंटरमधील डॉ. मिरजे, डॉ. बडबडे यांच्यासह बाळासाहेब माने आदी उपस्थित होते.
       मागील तीन महिन्याभरापासून डीकेटीई येथील वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरु आहे. याठिकाणी असलेले डॉक्टर्स, नर्स व स्टाफ यांच्याकडून रुग्णांना आवश्यक सुविधांसह चांगली सेवा देण्यात येते. त्यातूनच अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 100 रुग्णांची क्षमता असलेल्या या केअर सेंटरमध्ये सध्या 90 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. तर दररोज सरासरी 15 रुग्ण चांगल्या उपचारानंतर बरे होऊन घरी परत जात आहेत.

error: Content is protected !!