आळतेमध्ये जलसंधारण साठी श्रमदान

     आळते ता हातकणंगले येथे डी.के.टी.ई. डिप्लोमा कॅालेजच्या विद्यार्थी- विद्यार्थीनी कडून जलसंधारण व वृक्ष संवर्धनासाठी श्रमदान करण्यात आले .यामध्ये जलसंधारण व वृक्षसंवर्धन याचे महत्व सर्वांना समजवण्यासाठी मजले गावचे शांतीनाश पाटील (जलमित्र फौंडेशन), आळते गावचे सुदाम चव्हाण व शीतल हावळे (जल व वृक्ष संवर्धन फौंडेशन आळते) यांनी मार्गदर्शन केले.

हातकणंगले तालुक्यातील पाण्याची सध्य परिस्थिती पाहता बरीच गावं दुष्काळग्रस्त आहेत सध्य परिस्थीतीत जमिनीमधील पाण्याची पातळी फार खोल गेलेली आहे, त्यामुळे बोअरवेल ४००-५०० फुट खोल मारुन सुद्धा पाणी लागत नाही. वळीव स्वरुपामद्ये व पावसाळ्यामद्ये पडणारा पाऊस हा कमी जास्त प्रमाणात पडतो, पावसाचे पडणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाहुन जात असताना त्याच्याबरोबर दगड माती सुद्धा वाहुन जाते अशा डोंगरावरती गवत किंवा झाडे झुडपे टिकू शकत नाहीत त्यासाठी डोंगर माथ्यावर पळणार्या पाण्याला चालायला लावणे चालणार्या पाण्याला थांबायला लावणे, व थांबलेल्या पाण्याला जमिनीमध्ये मुरवणे म्हणजेच लुज बोल्डींग ,सी.सी.टी ., डीप सीसीटी , मातीचे बंधारे व वन तळी, ओढा व ओघळ खोलीकरण व रुंदीकरण करणे अशा शाष्त्रोक्त पद्धतीने जलसंधारणचे काम केल्याने पाणी जमिनीमद्ये मोठ्या प्रमाणात मुरले जाते त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते तसेच गवत व वृक्ष यांच्या बीया पक्षांच्या विष्टेतून रुजू होऊन वृक्षांची चांगल्या प्रकारे वाढ होते. ओढा नदी यांच्यामधील गाळ साचण्याचे प्रमान कमी होते म्हणून जलसंधारणचे कार्य करणे काळाची गरज आहे. अशी माहिती देण्यात आली

 आळते गावाला डोंगर परिसर मोठ्या प्रमाणात लाभल्यामुळे गावातील युवक एकत्रित येऊन जल व वृक्ष संवर्धन फौंडेशन आळते आणि आर्ट ॲाफ लिवींग  आळते यांचे श्रमदानाचे कार्य सातत्यपुर्ण सुरू आहे. ह्या कार्यामद्ये श्रमदान देण्यासाठी डी के टी ई डीप्लोमा कॅालेजचे सर्व  ११४ विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी ४० सीसीटी खोदले व ३ लुज बोल्डर बांधले. यावेळी कॅालेजचे प्रा. ए. सी. मुरगुडे ,प्रा. सौ. एस. बी. कुर्डेकर, सौ. व्ही. आर तोशणीवाल ,कॅालेजचे माजी विद्यार्थी  कुलदीप चव्हाण व आर्ट ॲाफ लिविंग आळते चे अनिकेत कनवाडे, नितीन भोसले, सागर सुतार, चेतन चव्हाण, निखिल हावळे, केतन तोडकर, अजित बनकर ,विजय हुक्कीरे ,जितेंद्र अंकलीकर उपस्थित होते.

error: Content is protected !!