डॉ.अण्णासाहेब मोहोळकर यांच्या संशोधन कार्याची जागतिक स्तरावर दखल २०२३ या वर्षांमध्ये १३ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध

शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागामध्ये कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ. अण्णासाहेब मोहोळकर यांच्या संशोधन ग्रुप ने जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०२३ या वर्षांमध्ये तब्बल १३ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. डॉ मोहोळकर यांचे एकूण १८० हुन अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहे व त्यांना जागतिक स्तरावर ८८०० हुन अधिक सायटेशन मिळाली आहेत.

या वर्षी सिरॅमिकस क्षेत्रातील जगातील टॉप ५ मध्ये गणले गेलेल्या सिरॅमिक इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये त्यांनी आपला शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे तसेच त्यांनी जर्नल ऑफ एनर्जी स्टोरेज, जर्नल ऑफ फिजिक्स केमिस्ट्री, इलेकट्रोकेमिका अक्ट, डायमंड, कॉलॉइड्स, नेक्स्ट मटेरियल, जर्नल ऑफ मटेरियल सायन्स अशा विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये त्यांनी आपले शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत.
याचीच दखल घेत त्यांना सलग चौथ्यांदा अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठ, एडी सायंटिफिक इंडेक्स यांच्या सर्वेक्षणात जागतिक टॉप २ % शास्त्रज्ञांमध्ये गौरविण्यात आले आहे. तसेच ऊर्जा क्षेत्रात शिवाजी विद्यापीठात त्यांनी अव्वलस्थान पटकावले आहे. तसेच डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने त्यांना अ‍ॅडजंट प्रोफेसर म्हणून गौरविले आहे.
सध्या ते सौर ऊर्जा, गॅस सेन्सिंग, सुपरकपॅसिटर, वॉटर स्प्लिटिंग, हैड्रोजन एनर्जी इ.विषयावर पुढील संशोधन करीत आहेत.
डॉ. मोहोळकर सातत्याने समाज आणि मूलभूत विज्ञानाशी सुसंगत संशोधनाला प्राधान्य देतात. त्यांनी गरजू, हुशार विद्यार्थ्यांना पोस्ट-डॉक्टरेट अभ्यासासाठी परदेशात पाठवून विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण केली आहे .समाजाला विज्ञानाची ओळख करून देणे हे त्यांचे सतत ध्येय असून समाजउपयोगी संशोधनावर त्यांचा भर आहे.
ते सध्या जगभरातील विविध प्रतिष्ठित जर्नल्ससाठी संपादक आणि समीक्षक म्हणून काम पाहतात. त्यांनी आठहून अधिक मोठे प्रकल्प पूर्ण केले असून त्यांना भारत सरकारकडून दीड कोटींहून अधिक निधी मिळाला आहे यामाध्यमातून त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप ऑफर करून त्यांना आर्थिक व शैक्षणिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. एकंदरीतच त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रात केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे.

error: Content is protected !!