डॉक्टर संपर्कातील चार पॉजिटिव्ह ; रुग्ण वाढल्याने घबराटीचे वातावरण

जयसिंगपूर /ता : २६

            जयसिंगपूर येथील शाहूनगर भागातील व गल्ली क्रमांक तीन येतील . या दोन्ही डॉक्टरांच्या संपर्कातील आतापर्यंत चार जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये गल्ली क्रमांक १७ मधील एकजण तर डॉ . बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमधील तीन असे एकूण शनिवारी दिवसभरात चार जणांचा समावेश आहे. यामुळे आता शहरात एकूण ३१ रुग्ण संख्या झाली आहे.यापूर्वी दोन मयत आहेत.
         जयसिंगपूर शहरातील शाहूनगर भागातील मंगळवारी आलेल्या एका डॉक्टरांच्या संपर्कातील गल्ली क्रमांक सतरा येथील एक . शुक्रवारी सायंकाळी गल्ली क्रमांक तीन येथील डॉक्टरांच्या संपर्कातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सोसायटीतील तीन अशा एकूण चार जणांचा अहवाल शनिवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. यांच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.जयसिंगपूर शहरात वाढत असलेली संख्या लक्षात घेता . आता शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
         या दोन्ही ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करून बॅरिगेट लावून सॅनिटायझर औषध फवारणी करण्यात आली आहे. गल्ली क्रमांक सतरा येथे नगराध्यक्षा डॉ . नीता माने , नगरसेवक पराग पाटील ,पालिका आरोग्य निरीक्षक प्रशांत शिवणे संदीप कांबळे तसेच पालिका कर्मचारी आरोग्य विभागाचे आरोग्यसेवक , जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे गोपनीय विभागाचे विजय पाटील यांनी भेट दिली. डॉ . बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमध्ये नगरसेविका सुलोचना कांबळे ,महेश कलगुटगी, रजनीकांत कांबळे आदीसह पालिका कर्मचारी उपस्थित होते .

गल्ली क्रमांक सतरा येथे औषध फवारणी करताना पालिका कर्मचारी

error: Content is protected !!