कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाली . सुरुवातीला पालकांकडून अंशताः स्वागत झाले . परंतु शिक्षकांनाच ऑनलाइन शिक्षण पद्धत माहीत नव्हती . त्यासाठी त्यांना कोणतेही प्रशिक्षण दिले नव्हते . काही पालकांच्याकडे ऑनलाइन सुविधा नाही. जशी दहा कोस गेले की भाषा बदलते . तशी प्रदेशानुरूप शिक्षण पद्धती सुद्धा बदलावी लागते . कारण शहरात मिळणारी सुविधा ग्रामीण भागात असत नाही . तर आदिवासी ,डोंगराळ भागातील व गरीब पालकांकडे स्मार्ट फोन सुद्घा नाहीत .यावर ऑनलाइन शिक्षण पद्धतीमधील अडचणी , पर्याय आणि शिक्षक – पालकांची कर्तव्य याची विस्तृत अभ्यासाची प्रस्तुत माहिती ऐका डॉ . मनिषा भोजकर यांच्याकडून आपल्याच सरळ व सोप्या भाषेत .