हातकणंगले/प्रतिनिधी
डॉ. सुजित मिणचेकर फौडेशनच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षक व शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी गेली सलग ८ वर्षे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येते.
त्यानुसार यावर्षी आदर्श शिक्षक २७ तर आदर्श शाळा २ व हायस्कूल १ व विशेष शिक्षक रत्न १ असे एकूण ३१ पुरस्कारांचे वितरण करून शिक्षकांचा व शाळांचा गौरव केला जाणार आहे. अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव व सचिव संजय चौगुले यांनी दिली.

पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांची नावे पुढील प्रमाणे प्राथमिक विभागातून वैशाली पाटील, अनिता कुंभार, भारती सुतार, फिरोज शिकलगार, गीतांजली पवार, निलिमा पाटील, महादेव पाटील, प्रेमलता गणबावले, शबनम जमादार, रूपाली घाडगे, अमीर मोमीन, संजय बामणे, सुरेश भानुसे तर माध्यमिक विभागातून अकबर पन्हाळकर, दिलीप कांबळे, सुनील पाटील, दिपाली पाटील, सुरेश डिग्रजे, सुनिल लष्करे, बंडू चौगुले, जितेंद्र कोष्टी, विष्णू पाटील, सचिन पाटील, युवराज चोकाकर, बाबासाहेब नाईक, पंडित चोपडे, प्रशांत पाटील

आदर्श प्राथमिक शाळा केंद्र शाळा पारगाव व विद्या मंदिर बाहुबली व आदर्श हायस्कूल ब्रिलियंट इंग्लिश मेडियम, नरंदे तसेच विशेष शिक्षक रत्न दादासाहेब लाड यांना देण्यात आलेला आहे. दरम्यान स्वागत तानाजी पवार तर आभार राकेश खाडे यांनी मानले.
