वसई /ता: ३-सुर्यकांत देशपांडे

नवी पिढी संस्कार क्षम घडविणे आवश्यक असुन शैक्षणिक क्षैत्रात नव्याने अंगिकारल्या जाणाऱ्या प्रणालीचे,धोरण नुकतेच जाहीर झाले असून ते क्रांतिकारक ठरेल, जवळपास तीन तपाहुन अधिक कालावधीनंतर हा अमुलाग्र बदल दिसत असुन बदलत्या काळानुसार नव्या पिढीला सक्षमव व संस्कारित बनविण्यासाठी बदल आवश्यक होता “. असे मत समाजसेविका प्राध्यापिका उत्कर्षा दरवेशी यांनी व्यक्त केले.
काल रक्षाबंधनच्या अनुशंगाने श्रीपाद वल्लभ सेवा संस्थेच्यावतिने सोशल डिस्टन्शनचे नियम पाळून झालेल्या उपासना सेवेच्या,कार्यक्रमातील चर्चे दरम्यान त्यांनी उपस्थितीताशी संवाद साधला तेव्हां त्यांनी हे मत व्यक्त केले.सध्याच्या कोरोनाग्रस्त वातावरणात एकिकडे शैक्षणिक क्षेत्रात काम करताना मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत वावरावे लागत असुन हे शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी समोर आव्हान ठरत असुन,विद्यार्थ्यांची सुरक्षा हि पालकांना भेडसावणारी समस्या आहे.अशा परिस्थितीत नव्या पिढीला घडविताना, काळानुरूप बदल स्विकारत वाटचाल करावी लागणार आहे,व त्यातून समोर येणारी आव्हाने स्विकारुन आपणास पुढे जावे लागणार आहे. असे हि त्या म्हणाल्या, यावेळी संस्थेचे अध्यक्ष सौरभ भोळे हेही उपस्थित होते