दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे वतीने दत्त जयंती उत्साहात साजरी

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र नदिवेस नाका,इचलकरंजी तसेच मधूबन, ,जवाहर नगर,कबनुर येथील सेवा केंद्रात देखील श्री गुरूदत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला.
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (नदिवेस नाका) यांचेवतीने श्री दत्त जयंती निमित्त २० डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण, अखंड नाम जप, यज्ञयाग सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हजारो भाविक सेवेकरी श्री दत्त जयंती सोहळ्यात सहभागी झाले होते.
श्री गुरुचरित्र पारायण तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग, मनोबोध याग, श्री चंडी याग, श्री गीताई याग, श्री स्वामी याग, श्री रुद्रयाग,श्री मल्हारी याग संपन्न झाले. तसेच सप्ताह कालावधीत संपूर्ण दिवसभर महिलांचे तर रात्रभर पुरुष सेवेकरी यांचे वतीनेअखंड प्रहरे ची सेवा करण्यात आल्या. मंगळवार २६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला ,नदी वेस नाका सेवा केंद्रात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या हस्ते आरती करण्यात आली. महाआरतीस भाविक सेवेकरी मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान बुधवार २७ डिसेंबर रोजी सत्यदत्त पूजन होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाळ आरती तसेच मानवीय जीवनातील विविध समस्यांवर आध्यत्मिक सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येत आहे असे आवाहन सेवा केंद्राचे वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!