जयसिंगपुरातून वृद्ध महिला बेपत्ता

शहरातील अवचितनगर समडोळे मळा येथून वृध्द महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. पार्वतीबाई धनसिंग गुरखा (वय ७५) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. पार्वतीबाई या वृध्देने घरात कोणास काहीही न सांगता कोठेतरी निघून गेल्या आहेत. घरातील लोकांनी सर्वत्र शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाही. याबाबतची वर्दी लताबाई धनसिंग गुरखा (वय ४७, रा. अवचितनगर समडोळे मळा, जयसिंगपूर) यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलिस नाईक कुलकर्णी करीत आहेत. सदरची महिला कोणाला आढळून आल्यास नातेवाईक व जयसिंगपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे | आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!