निवडून येणाऱ्या लोक प्रतिनिधींनी काम केले पहिजेच – रेश्मा सनदी

कबनुर /वार्ताहर
   मतदारांनी प्रामाणिकपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपणाला निवडून देतात , त्याचे भान ठेवून मतदारसंघामध्ये निवडून येणाऱ्या लोक प्रतिनिधींनी काम केले पाहिजे. असे मत हातकणंगलेच्या पंचायत समिती माजी सभापती सौ. रेश्मा सनदी यांनी व्यक्त केले.त्या कबनुर (ता. हातकणंगले) येथील मळेभागातील चव्हाण मळा व सनदी मळा याठिकाणी नळ पाणी पुरवठा योजनेचा उदघाटन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. कमल चव्हाण ह्या होत्या. यावेळी सौ. सनदी म्हणाल्या , नागरिक व प्रशासन या मधील महत्वाचा दुवा लोकप्रतिनिधी असतो. दुवा साधण्याचे काम यशस्वीरित्या हाताळल्याने सार्वजनिक हिताचे कार्य होत असतात. तेच कार्य मी करीत असलेने नागरिकांनी मला दुसऱ्यांदा निवडून दिले. त्याची पोचपावती म्हणून मला सर्वांगीण विकासाची कामे केलीच पाहिजे , असे म्हणाले.

   यावेळी युवराज घाटगे, प्रकाश चव्हाण, पापालाल सनदी, बशीर सनदी, लाला सनदी, बंडा चव्हाण, इम्त्याज सनदी, हजरत सनदी, अविनाश माने, दादासो कांबळे, नजरुद्दीन सनदी, सिकंदर सनदी, सौ विद्या चव्हाण उपस्थित होते.

error: Content is protected !!