हातकणंगले ओबीसी विभागाच्या तालुकाध्यक्ष पदी शकील अत्तार यांची निवड

आळते /वार्ताहर
हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या तालुकाध्यक्ष पदी आळते गावचे शकील काशीम अत्तार यांची निवड करण्यात आली . यावेळी शकील अत्तार यांनी सर्व काँग्रेस नेतेमंडळीचा आभार मानले . व कॉग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रामाणिक व निष्ठेने काम करीत राहणार असल्याचे सांगितले .


नियुक्तीचे पत्र आम . राजूबाबा आवळे, तालुकाध्यक्ष भगवानराव जाधव, यांच्या हस्ते देण्यात आले . यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गुरव, हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुण जानवेकर, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष नूरमहमंद मुजावर, बुवाचे वठार सरपंच शिंदे , आळतेचे ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे, प्रदीप कदम, रोहित माटे, राजू नलवडे, पिंटू किनिंगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!