एक सामान्य शिक्षक ते यशस्वी उद्योजक, तुलसीदास साळूंखे.

    उद्योजक किंवा व्यावसायिक व्हावे. अशी सर्वांची इच्छा असते. पण प्रयत्न सर्वजण करत नाहीत. पण असाच एक प्रयत्न  तुलसीदास साळूंखे यांनी केलाकर्नाटक राज्याच्या नकाशात देखील ठळकपणे नसलेले, निपाणी शहरापासुन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरपेवाडी या अगदी लहान खेडेगावात तुलसीदास साळूंखे यांनी एका कॉलेज मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना 2012 साली इलोक्ट्रोसल हाय-टेक या नावाने  कंपनी सुरू केली

पण पहिली चार वर्षे भांडवलाचा प्रचंड तुटवडा व अनुभवाचा अभाव यामुळे पदरी पडले ते प्रचंड मोठे अपयश व आर्थिक नुकसान. पण आपण यशस्वी उद्योजक होऊ ही मानसिकता , प्रचंड प्रमाणात घेतलेली मेहनत व धाडसाच्या जोरावर अवघ्या आठच वर्षांत संपूर्ण उद्योग जगताला त्यांनी गवसणी घातली
फक्त एका व्यक्ती पासुन चालू झालेली कंपनी आज पन्नास पेक्षा जास्त लोकांना रोजगार देत आहे. एवढेच नव्हे तर जागतीक बाजारपेठेत सुद्धा अदिराज्य गाजवत आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात 20 पेक्षा जास्त देशातील विद्यार्थी व भारतातील सर्व राज्यातील  विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक, रोबोटिक्स, मेकाट्रानीक या विषयांत नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. यासाठी गेल्या आठ वर्षांत सत्तर हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तुलसीदास सरांनी व्याख्याने व कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे.
error: Content is protected !!