सीईटीसाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी घेण्यात येणाऱ्या बी.ए/बी.एस्सी-बी.एड अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेकरीता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्यास ३० मार्चपर्यंत मुदत होती. आता इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी १५ एप्रिलपर्यंत अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.orgवर अर्ज करू शकतात. उमेदवार व पालकांकडून बी.ए/ बी.एस्सी-बी.एड अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार लक्षात घेऊन महा बी.ए/बी. एस्सी-बी.एड (४ वर्ष एकात्मिक) सीईटी २०२४ साठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सीईटी सेलने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती cetcell.mahacet. org संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

error: Content is protected !!