उद्योग क्षेत्रातील दानशुर परिस काळाच्या पडद्याआड

सुर्यकांत देशपांडे, नालासोपारा

      फाय फाउंडेशनच्या माध्यमातूनअनेक मान्यवर, गुणीजनांसह कर्तबगार महापुरुषांचा “राष्ट्रभुषण” या पुरस्काराने गौरव करणाऱ्या मान्यवरांचे अग्रणी,इचलकरंजीचे महनिय उद्योगपती तसेच नगरीचे जनप्रिय माजी नगराध्यक्ष सन्मानिय पंडितराव कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त समजले. त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजलीप्रत्येक नगरीचे एक वैशिष्ट असते.त्या नगरीशी अशा अनेकांचा एक आपलेपणाचा अनोखा संबंधअसतो. पंडितरावांचे तसे, कुठलेही पक्षीय,सामाजिक राजकीय वातावरणाशी संबंध नसतानाही,आपापल्या ठिकाणी कार्यरत राहून जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्व पैकी त्यांचे एक प्रसन्न,शांत व्यक्तिमत्व म्हणावे लागेल.१९७४ साली इचलकरंजीत संपन्न झालेल्या,सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाचेवेळी, मा.पंडितराव इचलकरंजीचे नगराध्यक्ष होते.त्यामुळे मान्यवरांच्या मांदियाळीतील त्यांच्या स्वागतापर भाषणाने,प्रफुल्लित झालेल्या संमेलनाध्यक्ष पु लं देशपांडे यांनी पंडितरावांच्या कार्याची व भाषणाची स्तुती करतानांच ते म्हणाले ,”बरे झाले पंडितरावांनी साहित्य क्षेत्रांत अधिक लक्ष दिले नाही ते,नाहीतर आम्हाला कुठेतरी कोपऱ्यावर सायकल पंक्चर रिपेरीचे दुकान काढावे लागले असते” हे उद्गार ,आजही आठवतात. तेव्हां ते सुवर्ण महोत्सवी संमेलनाचे वातावरण मनात तरळून राहते. असे हे भव्यदिव्य सोहाळे आणि तेवढीच मोठी व्यक्तीमत्वे ही या नगरीचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.इचलकरंजीत त्या काळात संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रम सोहळ्यापैकी फाय फाउंडेशनचा “राष्ट्रभूषण” पुरस्कार सोहळा हा एक दर्जेदार आणि इचलकरंजीचे मोठेपण जागतिक कीर्तीवर पोहचविणारा असाच सोहळ म्हणावा लागेल,आणि या सर्वांमागील व्यक्तीमत्वापैकि पंडितरावांचे मोठेपण हि निराळेच म्हणावे लागेल.या पार्श्वभूमीवर पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांनी, आपले संगीत क्षेत्रातील भगिरथपद गौरवितांना नगरीला जे मोठेपण प्राप्त करुन दिले, तेच मोठेपण  पंडितरावांनी आपल्या सर्वाभिमुख अशा कर्तुत्वाने वृद्धिंगत केले.राष्ट्रभुषण पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवरांची आणि गुणीजनांची पायधुळ जिथे लागली,अशा पुण्यपावन नगरीतील आपला जन्म आणि निर्माण झालेले नाते,मातृप्रेमासह अधिकच ओलावले गेलेले असे.पंडितरावांच्या निधनाचे वृत्त ऐकले आणि आठवणी जाग्या झाल्या.पुनश्च एकदा पंडितरावांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

1974 च्या सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संग्रहित छायाचित्र

                                                                                         शब्दांकन

सुर्यकांत देशपांडे नालासोपारा,(मो.नं.७४९८१५५१९८) 

 

                        कै. पंडितकाका कुलकर्णी यांना विनम्र आदरांजली

error: Content is protected !!