भाऊबंदकीतून दोन गटात मारामारी; दोन महिलांसह पाच जखमी ,परस्परविरोधी फिर्याद तर सहाजण ताब्यात

गारगोटी /प्रतिनिधी
  गारगोटीपासून दोन किलोमीटर असलेल्या शिंदेवाडी गावांत गेल्या कित्येक दिवसापासून शेजारील भाऊबंदकीतून असलेल्या वादाचे पर्यवसान आज रात्री मारामारीत झाले, मारामारीत काठी, कुऱ्हाड ,फावडे व खुरप्याचा सर्रास वापर झाला . मारामारीत दोन महिलांसह पाचजण जखमी झाले असून भुदरगड पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत . दोन्ही बाजूच्या दहा जणाविरोधात गुन्हा दाखल करणेत आला असून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
    याबाबत भगवान नामदेव पाळेकर (वय ४५ रा .शिंदेवाडी ) यांनी भुदरगड पोलिसात देणेत आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेजारी राहणाऱ्या रामचंद्र ज्ञानदेव पाळेकर यांच्यात घराशेजारील बोळावरून वाद आहे. आज रामचंद्र पाळेकर यांनी तिथे असणाऱ्या कुत्र्यावरून घालून पाडून बोलल्याबद्दल फिर्यादी भगवान याने रात्री तू कुत्र्यावरून का बोललास याचा जाब विचारल्यानंतर आरोपी रामचंद्र पाळेकर, सौ लता रामचंद्र पाळेकर, कृष्णा ज्ञानदेव पाळेकर, वैभवी कृष्णा पाळेकर, नीता दत्तात्रय घेवडे, विश्वजीत दत्तात्रय घेवडे, यांनी जमावाने येऊन शिवीगाळ करत मारहाण केली. व जीवे मारण्याची धमकी दिली . तसेच जवळचे फावडे उचलून डोक्यात मारले, यात भगवान पाळेकर, भावजय सुनीता सागर पाळेकर,व भाऊ सागर नामदेव पाळेकर हे जखमी झाले आहेत, या बाबत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर रामचंद्र ज्ञानदेव पाळेकर (वय ४५ रा शिंदेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी दारात उभे असतांना शेजारी राहणारे सागर नामदेव पाळेकर, सुनीता सागर पाळेकर, भगवान नामदेव पाळेकर,बेबीताई नामदेव पाळेकर यांतील सागर याने जीवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चुकवला व तो घाव वैभवी हिच्या पायाला लागला व ती जखमी झाली आहे,तिच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. याबाबत वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख व मयेकर करीत आहेत.

error: Content is protected !!