सुळकूड’साठी मोठ्या संख्येने सूचना दाखल करा

इचलकरंजी : शहरासाठी महत्त्वाची आणि गरजेची असलेली सुळकुड पाणी योजना तातडीने राबविण्यात यावी, यासाठी शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध संघटना, समाजसेवी संस्था व मंडळे, विविध असोसिएशन्स, या क्षेत्रातील माहितगार व तज्ञ, विविध महिला संघटना व पाणीप्रश्नी सहभागी जाणकार नागरिक यांनी मोठ्या संख्येने योजनेच्या समर्थनार्थ सूचना २६ मार्चपर्यंत प्रांताधिकारी कार्यालयात दाखल कराव्यात, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी समन्वयक प्रताप होगाडे, अभिजीत पटवा, नागेश शेजाळे, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, पुंडलिक जाधव, कॉ. सदा मलाबादे प्रमुख उपस्थित होते.

error: Content is protected !!