अलायंन्स हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांकडुन आर्थिक लुट -जि. प. सदस्या वंदना मगदूम ; चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासह आमरण उपोषणचा इशारा

इचलकरंजी / प्रतिनिधी
      इचलकरंजी येथील अलायंन्स हॉस्पिटलमध्ये गोरगरीब जनतेची व अडचणीत असणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांची आर्थिक लुबाडणूक व लुट सुरु असून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ज्यादा पैसे घेवुन लुबाडले जात आहे. तरी गोरगरीब जनतेची लुबाडणूक करणाऱ्या अलायंन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची चौकशी करून गुन्हा दाखल करावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या माजी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम व माणगावचे सरपंच राजू उर्फ अभय मगदूम यांनी लेखी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
    कोविडसारख्या महामारीमध्ये इचलकरंजी येथील नामांकित समजल्या जाणाऱ्या अलायंन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोविड पेशंटची सर्रास आर्थिक लूट करते. याबाबत पुराव्यासहित महाराष्ट्र राज्य शासनाकडे व जिल्हाधिकारी कोल्हापूर , सिव्हिल सर्जन कोल्हापूर , मुख्य अधिकारी इचलकरंजी नगरपालिका, प्रांताधिकारी इचलकरंजी यांच्याकडे संबंधित हॉस्पिटल व हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करावी. याबाबत लेखी निवेदन देवुन सर्व पुरावे सादर केले असून या हॉस्पिटलच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी हा लढा देणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम व सरपंच राजू उर्फ अभय मगदूम यांनी व्यक्त केले .
     तसेच गोरगरिबांचा न्यायासाठी हॉस्पिटल विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कोरोनाच्या कालावधीत अलायंन्स हॉस्पिटल शासनाने ताब्यात घेऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करावे. त्याच बरोबर प्रशासनाचा कारभार अतिशय बोगस असून मागील दोन वर्षापासून महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्याच्या नांवे अनुदान घेतले आहे. अशा सर्व लाभार्थ्यांची प्रत्यक्ष फेरपडताळणी करण्यात यावी. तसेच जानेवारी 2020 ते मे 2021 पर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या सर्व लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून शासकीय लेखा विभागामार्फत स्पेशल ऑडिट करून चौकशी करून हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करावी . अशी मागणीही वंदना मगदूम व सरपंच राजू उर्फ अभय मगदूम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली .
  हॉस्पिटल हे गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी असून त्यांनी योग्य ती फी घेऊन त्यांच्यावर उपचार करावेत . गोरगरीब जनतेकडून लुबाडणूक करणे हे योग्य नसून असे करणाऱ्या हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करणेची मागणी केली आहे .

    

error: Content is protected !!