खोची विकास संस्थेतर्फे सभासदांना पाच टक्के लाभांश – दीपकराव पाटील

 खोची तालुका  हातकणंगले  येथील खोची विकास संस्थेला आर्थिक वर्षात दहा लाख रुपयांचा नफा झाला असून सभासदांना पाच टक्के लाभांश देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सभापती व वारणा दूध संघाचे संचालक दीपकराव पाटील यांनी सर्वसाधारण सभेत दिली.

ते म्हणाले, ‘संस्थेला आर्थिक वर्षात ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. संस्थेने विविध प्रकारचे ३ कोटी ९१ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. वार्षिक उलाढाल १५ कोटी ७१ लाख आहे.’ प्रमोद पाटील यांना आदर्श तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. वसंतराव गुरव, प्रा. बी. के. चव्हाण, जगदीश पाटील, डी. बी. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीपराव सुर्यवंशी, सरपंच अभिजित चव्हाण, जगदीश पाटील, सयाजी पाटील, विरोचन शिंदे, महेश पाटील, सुहास गुरव आदी उपस्थित होते.
सचिव प्रमोद पाटील यांनी अहवाल वाचन केले. राम जाधव यांनी सुत्रसंचालन केले. प्रकाश चव्हाण यांनी आभार मानले.

error: Content is protected !!