पाच रुपये अनुदानासाठी दूध उत्पादकांकडून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्या – डॉ. सुजित मिणचेकर

उदगाव येथील गोकुळच्या संपर्क मेळाव्यात शासनामार्फत राज्यातील गाय दूध उत्पादकांसाठी गाय दूध खरेदीसाठी पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने गाय दूध उत्पादकांकडून सदर अनुदानासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची व इतर बाबींची पूर्तता त्वरीत करून घेण्याबाबतच्या सूचना हातकणंगले व शिरोळ तालुका व परिसरातील उपस्थित संस्थांच्या सचिवांना गोकुळचे संचालक सुजित मिणचेकर यांनी केल्या ते उदगाव येथील आयोजित संस्था सचिवांच्या संपर्क मेळाव्यात बोलत होते.

    यावेळी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सॅटेलाईट डेअरीचे सचिव जाधव, संकलनचे शरद तुरंबेकर, डॉ. मोंगले, बाबुराव परीट यांच्यासह गोकुळचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच संस्था सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!