पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी माजी खासदार राजू शेट्टीनी ठोकला मतदारसंघात तळ

पंढरपूर/प्रतिनिधी

 पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये (Pandharpur assembly by election) राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके (NCP Bhagirath Bhalke) यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. आता खुद्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आपला उमेदवार विजयी करण्यासाठी मतदारसंघामध्ये तळ ठोकलेला आहे.

 या पोटनिवडणुकीच्या प्रचारात राजू शेट्टी हे आक्रमकपणे भाजपसह महाविकास आघाडीलाही घेरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी आणि 100 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करावे. शेतकरी संघटना आता सरकारच्या अपयशावर बोट ठेवणार आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

error: Content is protected !!