हातकणंगले मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

हातकणंगले प्रभाग क्रमांक 4 मध्ये सचिन बोराडे युवाशक्ती, माणुसकी फोंडेशन, आणि PTM Boys यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी तसेच आभा कार्ड, ई श्रम कार्ड, पॅन कार्ड आणि डिमेंट अकाउंटचे शिबीर संपन्न झाले. सुमारे 200 हुन अधिक लोकांनी यांचा लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष अरुण कुमार जाणवेकर, माणुसकी फोंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी दादा जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. आधार कार्ड संदर्भात लोकांच्या बऱ्याच समस्या आहेत. त्या संदर्भात एका शिबिराचे आयोजन लवकरच करण्यात येईल अशी ग्वाही सचिन बोराडे यांनी दिली. या वेळी माणूसकी फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!