राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विनामूल्य कोविड सेंटर

पुणे/प्रतिनिधी

   राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महापालिका जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोणाचा सामना करण्यासाठी पुण्यात विनामूल्य कोबी केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी दिली.

    पी टी सी आर (पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स) सह्याद्री हॉस्पिटल, लोहिया परिवाराचे श्री मुकुंद भवन ट्रस्ट, लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट, परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या सहयोगाने हे कोविड सेंटर गुढीपाडव्याला सुरू झाले.

  कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेल्या या सेंटरमध्ये 450 बेडची व्यवस्था आहे.
एका खोलीत तीन रूग्ण असतील. येथील रूग्णांना चहा, नाश्ता, दोन जेवण आणि औषधे मोफत मिळतील. आठ प्रशिक्षित डॉक्टर, 25 प्रशिक्षित कर्मचारी, 24 तास उपलब्ध असतील.

   एका खोलीत तीन रुग्णांची व्यवस्था असेल कोणते लक्ष नसलेले पण पॉझिटिव्ह असलेले रुग्ण ज्यांना विलगीकरण आवश्यक आहे आणि घरात सुविधा नाही अशा रुग्णांसाठी हे सेंटर असेल. स्वयंसेवक म्हणून काम इच्छुक असणाऱ्यांनी 93 59 69 30 45 या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा .असे आव्हान राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आले आहे .       

error: Content is protected !!