कबनूरमध्ये शुक्रवारी कुस्ती मैदान

कबनूर

येथील ग्रामदैवत श्री जंदिसो व श्री ब्रॉनसो ऊरुसानिमित्त शुक्रवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. या मैदानात महिलांच्याही निकाली कुस्ती होणार आहेत, अशी माहिती उरूस समितीने दिली.
प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन पैलवान रोहित लाडपूर यांच्यामध्ये आहे. द्वितीय क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध हरियाणाचा पैलवान सोनू कुमार भवानी यांच्यामध्ये होणार आहे. तृतीय क्रमांकाची कुस्ती शिवराम दादा कुस्ती संकुलाचा पैलवान शुभम सिद्धनाळे विरुद्ध भोसले व्यायाम शाळा चा पहिलवान प्रशांत शिंदे यामध्ये होणार आहे. चतुर्थ क्रमांकाची कुस्ती व्यंकोबा मैदानाचा पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध हांडे पाटील तालीम मंडळचा पैलवान सुरेश ठाकूर यांच्यामध्ये होणार आहे. पाचव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पैलवान प्रकाश इंगळगी विरुद्ध गंगावेश तालीमचा पैलवान कमलजीत पंजाब यांच्यामध्ये होणार आहे. विशेष आकर्षण म्हणून नेपाळचा पैलवान देवा थापा याची कुस्ती होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीतील विजेत्यास पैलवान देवगोंडा बाळगोंडा पाटील (वस्ताद) यांच्या स्मरणार्थ पैलवान अशोक देवगोंडा पाटील यांच्याकडून चांदीची गदा बक्षीस दिली जाणार आहे.
या कुस्ती मैदानात महिलांच्या कुस्ती होणार असून प्रथम क्रमांकाची कुस्ती शहापूरची पैलवान आर्या नवनाळे विरुद्ध हातकणंगलेची पैलवान ईश्वरी गडकरी यांच्यामध्ये आहे. द्वितीय क्रमांकाची कुस्ती कन्या महाविद्यालयाची पैलवान ऋतुजा बिले विरुद्ध कर्नाटकची पैलवान निकिता मुरगुडी यांच्यामध्ये आहे. तृतीय क्रमांकाची कुस्ती कबनूरची पैलवान जागृती पाटील विरुद्ध शहापूरची पैलवान प्रतिमा कांबळे यांच्यामध्ये होणार आहे. याशिवाय महिलांच्या आणखीन कुस्त्या होणार आहेत.

error: Content is protected !!