कोल्हापुर /ताः ३
कोल्हापूर येथील तराजू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, सागर मळा येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व तराजू को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी येथील पदाधिकारी, यांच्या तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी झाडांना फ्रेंडशिप बँड बांधून वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमास अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जोशी , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विवेक जोशी , कोल्हापूर शहराध्यक्ष प्रशांत जोशी ,कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय कुलकर्णी, सरोज फडके , कोल्हापूर युवा अध्यक्ष गुरुप्रसाद कुलकर्णी, कोल्हापूर युवा उपाध्यक्ष हरीश शिंदे, सांस्कृतिक आघाडीचे अनंत जोशी, सीए आघाडीचे सतीश निलजीकर, तसेच कोल्हापूर तराजू हौसिंग सोसायटी, महावीर नगर , सागर मळा, येथील अध्यक्ष उल्हास दोशी, सेक्रेटरी राजमल परमार, माजी नगरसेवक अशोक जामसांडेकर, विलास भंडारी, हरीश शिंदे, उमेश बुधले उपस्थित होते.