रुकडीत अन्न : विज्ञान, संस्कृती विपणन व वाङ्मय यावर उद्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

रुकडी : येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात अन्न :विज्ञान, संस्कृती, विपणन आणि वाङ्मय या विषयावर बुधवार २० रोजी सकाळी १० पासून दिवसभर आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर आणि तुकाराम कृष्णाजी कोलेकर कॉलेज, नैसरी यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले असून सहआयोजक म्हणून रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब अतिग्रे, नारायणदास दामोदर भंडारी फाऊंडेशन इचलकरंजी, टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन सांगली, चौगुले डेअरी इचलकरंजी, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय माजी विद्यार्थी फाऊंडेशन, रुकडी सहआयोजक आहेत. या चर्चासत्रात सलाहदिन युनिव्हर्सिटी, इराकमधील डॉ. माहसा मोसफेरॉन बीजभाषण करणार आहेत. तर साधनव्यक्ती म्हणून अदिब मझनदर्न युनिव्हर्सिटी, इराण मधील पूरीया मलाही, नॉलेज युनिव्हर्सिटी इराक मधील अहमद डि महंमद सबिर तसेच आझाद युनिव्हर्सिटी इराण मधील मिस. मेलिका नेमाती मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राचे संयोजक प्रा. (डॉ.) उत्तम पाटील, समन्वयक प्रा. (डॉ.) गिरीश मोरे व प्रा. (डॉ.) सबिहा फरास आहेत. या चर्चासत्रात विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक विविध विषयावर आपले संशोधन लेख सादर करणार आहेत. या चर्चासत्रात विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे, प्राचार्य डॉ.एल.डी. कदम,
प्राचार्य डॉ. एस. बी.भांबर यांनी केले आहे.

error: Content is protected !!