माणुसकी फौंडेशनकडुन बेवारस, निराधार शवाचा दफणविधी

इचलकरंजी / प्रतिनिधी

     ” ज्यांना कोणी नाही, त्यांच्यासाठी आम्ही आहोत ” अशी तत्पर सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या माणुसकी फौंडेशनने बेवारस व निराधार शवाचे दफणविधी केला.

     काही दिवसांपूर्वी इचलकरंजी डेक्कन रोडवरील अग्निशमक दलाजवळ एक अज्ञात माणूस पडला होता, याची माहीती मिळताच माणुसकी फौंडेशनचे सदस्य आकाश नरुटे व इम्रान शेख तिथे पोहचले . पण, ती व्यक्ती तिथे मृत होऊन पडलेली आढळली. तात्काळ आकाश नरुटे व इम्रान शेख यांनी ही माहिती पोलीस स्टेशनला कळवली . व पोलिसांच्या सहकार्याने त्या मृत व्यक्तीचे शव इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. त्यानंतर शव दोन दिवस ओळख पटण्यासाठी रुग्णालयात ठेवले, रिपोर्ट क्लिअर आल्यावर व निराधार असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांच्या सल्ल्याने माणुसकी फौंडेशनच्या सदस्यांनी त्या मृत व्यक्तीचा दफनविधी करून त्यांचे अंतिम कार्य पार पाडले.

error: Content is protected !!