गंगामाई गर्ल्स हायस्कूलचा निकाल 100 टक्के

इचलकरंजी/प्रतिनिधी

कु. अपूर्वा सुर्यकांत घोलकर

        येथील श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलने दहावीच्या परीक्षेतील शंभर टक्के यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. तर या प्रशालेतील विद्यार्थीनी कु. अपूर्वा सुर्यकांत घोलकर हिने 99.60 टक्के गुण मिळवून प्रथम, कु. रुचा समीर जहागिरदार हिने 98 टक्के गुणांसह द्वितीय तर कु. केतकी केदार देशपांडे आणि कु. श्रेया गंगाराम पाटील यांनी 97 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे.
      गंगामाई गर्ल्स हायस्कूलने प्रारंभापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यशाचा आलेख उंचावत ठेवला आहे. यंदाच्या परीक्षेसाठी 261 विद्यार्थीनी बसल्या होत्या. त्या सर्व विद्यार्थीनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष प्राविण्यमध्ये 147, प्रथम श्रेणीत 84, द्वितीय श्रेणीत 28 तर तृतीय श्रेणीत 2 विद्यार्थीनींनी यश मिळविले आहे.
        या विद्यार्थीनींना प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर, उपमुख्याध्यापक बी. आर. कांबळे, उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक वाय. बी. बंडगर यांचे प्रोत्साहन तसेच सर्वच शिक्षक-शिक्षिका यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्वच विद्यार्थीनींचे संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बोहरा, चेअरमन हरिष बोहरा, व्हा. चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर राजगोपल डाळ्या व मानद सचिव बाबासाहेब वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!