वाठारच्या उपसरपंचपदी गजेंद्र माळी बिनविरोध

वारणानगर

वाठार तर्फ वडगांव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी गजेंद्र शंकर माळी यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून वाठारचे मंडळाधिकारी अमित लाड होते.
माजी उपसरपंच महेश कुंभार यांनी दिलेल्या पदाचे राजीनाम्यामुळे उपसरपंच रिक्त पदाच्या झालेल्या बैठकीत सदस्य गजेंद्र शंकर माळी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचीन कुंभार, महेश कुंभार, सुरेखा मस्के, सुहास पाटील, अश्विनी कुंभार, श्रीमती सुशिला चौगुले, महेश शिर्के, सुजाता मगदुम, राहुल पोवार, रुक्साना नदाफ-पिंजारी, रेश्मा शिंदे, सचीन कांबळे, नाजुका भुजिंगे, तेजस्विनी वाठारकर यांचेसह आघाडी प्रमुख, वारणा दुधचे संचालक महेंद्र शिंदे, उद्योजक शरद बेनाडे, प्रा. नानासो मस्के, राजाराम क्षीरसागर, सुरेश नरके, बी.एस. पाटील, ग्रामविकास अधिकारी दशरथ शिंदे उपस्थित होते.

error: Content is protected !!