कोल्हापुर /ता : ९-राजेंद्र शिंदे
करवीर तालुक्यातील काही गावे सध्या पुरबाधित होण्याच्या मार्गावर आहेत . त्यातच काल रात्री गांधीनगर, निगडेवाडी,मसुटे मळा, मनाडे मळा या परिसरात वीज सिंगल फेज झाली . त्यामुळे सर्वच परिसरातील घरगुती लाईट बंद झाली . वीज वितरण कंपनीने तात्काळ दुरूस्तीचे काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या ठिकाणी लाईट बंद झाली होती . तिथे पूर आला होता.त्यामुळे तिथे जाणे शक्य नव्हते .
तात्काळ उचगावचे माजी सरपंच मधुकर चव्हाण यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधून बोटीची मागणी केली. यावर नाम . पाटील यांनी लगेच आपत्ती व्यवस्थापनसह बोट पाठवून दिली . आज सकाळी वीज वितरणचे शाखा अभियंता रघुनाथ लाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बोटीतून सुमारे दीड -दोन किलोमीटर पुराच्या पाण्यात जाऊन दुरुस्ती करून लाईट चालू केली . त्यामुळे परिसरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या तत्पर कामाचे परिसरातून कौतुक होत आहे,
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनने काम केले.

यावेळी मनाडे मळ्यातील बाजीराव मनाडे, नारायण मनाडे,मसुटे मळाचे दीपक मसुटे, राजू मसुटे,निगडेवाडीचे
विश्वास निगडे,उमेश निगडे, यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनचे सर्व आधिकारी आणि सदस्य,तसेच वीज वितरणचे अधिकारी आणि वायरमन उपस्थित होते.