हातकणंगलेत गणेश जयंती निमित्त विविध कार्यकमांचे आयोजन

श्री गणेश जयंती व मंदिराच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री चिंतामणी गणेश मंदीरच्यावतीने १२, १३ फेब्रुवारी रोजी विविध स्पर्धांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १२ रोजी सकाळी ८ वाजता पुण्याहवाचन, देवता स्थापना, नवग्रह याग, गणेश याग, महालक्ष्मी याग आदी धार्मिक कार्यकमांचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता खास महिलांसाठी झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले असून त्यासाठी सुमारे लाखांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. सायंकाळी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज फिरते वाचनालयाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
१३ रोजी श्रींचा अभिषेक, पूजा, हवन, जन्मकाळ सोहळा होणार असून त्यानंतर पालखी सोहळा आहे. दरम्यान, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कारही केला जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!