मंडप उभारणी,देखावा, सजावट अंतिम टप्प्यात
गणेश उत्सव ४ दिवसावर आला असून सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग सुरु आहे. मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आली असून लायटिंग, सजावट ,स्वागत कमानी तयार करण्यात कार्यकर्ते व्यस्थ आहेत . रात्री उशिरा पर्यंत गलो-गली बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे . कुंभारवाड्यात देखील गणेश मूर्तींचे काम पूर्ण झाले असून, अनेक मोठ्या गणेश मूर्तींचे मंडळांकडे आगमन होत आहेत .बाजारपेठा देखील डेकोरेशनच्या वस्तूनी सजल्या आहेत .

बाप्पांच्या आगमनाच्या तयारी साठी घरोघरी गणेश भक्त वेगवेगळी सजावट साकारत आहेत यावर्षी चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यामुळे अनेक ठिकाणी चांद्रयान मोहिमेचा देखावा साकारला जात आहे. सर्वत्र चैतन्न्याचे व आनंदाचे वातावरण तयार झाले आहे .
