पाटण तालुक्यातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी दिला लाडक्या बाप्पाला निरोप

पाटण / ता.१-विक्रांत कांबळे

       गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या . अशा भावनिक जयघोष करत पाटणसह तालुक्यातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाला उत्साही व भक्तीमय वातावरणात अनंत चतुर्दशी दिवशी टाळ मृदुमच्या वाद्यात ज्ञानोबा माऊली तुकाराम .मोरया मोरया  गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयजयकार करत घरगुती . व सार्वजनिक गणपतीचे   भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत साधे पणाने भक्ती भावे निरोप दिला. यावेळी मोरयाच्या जयघोषाने परिसर आनंदमय झाला होता.

      कोरोनाचे सावट घोगांवत असल्याने या वर्षी अनंतचतुर्दशीला घरगुती गणपतीचे सकाळ पासुनच काही भाविक गणपतीचे विसर्जन करीत होते . अगदी लहान लहान मुलांसह अबालवृध्द, महिला, युवकांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा घोषणा देत कोयना नदीपात्रात गणपतींचे अत्यंत भक्ती.भावे.शातंतेत विसर्जन केले. कुठे ही गर्दी दिसत नव्हती .

     अनंत चतुर्थदशीदिवशी मंगळवारी  दि. १ सप्टेबंर  रोजी दुपारी ४  वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्षात शहरातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. यादिवशी पाटण  मधील सार्वजनिक गणेश मंडळांनी व पाटणचे ग्रामदैवत व सिध्दी विनायक ट्रस्टच्या लायब्ररी चौकातील मानाच्या हनुमान सेवा मंडळाचे . नवसाला पावणाऱ्या या गणपतीच्या दर्शनासाठी पाटणसह परिसरातील अबाल वृध्द भाविकांनी गर्दी केली नाही .  नूतन तरूण मंडळ, शिवाजी उदय मडंळ समाज सेवा संघ, झेंडा चौकातील प्रताप सेवा मंडळ,  शिवलिंग मंडळ, श्रीराम तरूण मंडळ, कलाकार मंडळ, कुंभारवाड्यातील बाल गजानन सेवा मंडळ, नवरत्न तरूण मंडळ, भोईगल्लीतील गणेश मंडळ, अष्टगंध मंडळ, अष्टविनायक मंडळ, चौधरी गल्लीतील गणेश मंडळ आदींसह विविध मंडळांनी देखील  सर्व गणेश मंडळांनी गणपती बप्पा मोरयाच्या घोषणा देत अत्यतं साधे पणाने  गणपतींचे कोयना नदीपात्रात विसर्जन केले.
   

वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवाची परंपरा असणाऱ्या पाटणमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीही आपली परंपरा खंडीत करत   विसर्जन मिरवणुकीत ना  आकर्षक सजावट ना  डोळ्यांचे पारणे फेडणारे देखावे सादर केले नाहीत .  तर कोरोनाचे  पार्श्वभूमीवर काही मंडळांनी विसर्जन मिरवणुका रद्द करत टाळमृदंगांच्या निनादात गणपतीचे विसर्जन केले. अनंतचतुर्थदशीच्या आदल्या दिवशी पाटण शहरातील काही गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले.

error: Content is protected !!