सावर्डेत गणेश मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसह गौरी आगमन

सावर्डे / वार्ताहर
सावर्डे (ता. हातकणंगले) येथे पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच तिसऱ्या दिवशी पारंपारिक पद्धतीने गौरींचे आगमन झाले . गावातील माहेरवाशिणी व मुलीनी पारंपारिक वेशभूषेमध्ये नटून-थटून ज्वारीचा , मक्याचा तुरा, गौरीचा डहाळा , हराळी आघाडा यांचा एकजुट बिंडा कळशीमध्ये घालून गावातून मिरवणुकीने गावाच्या वेशीवर जाऊन विधीवत पूजा करून परत आपापल्या घरी येऊन गणेश मुर्तीच्या शेजारी गौरीची प्रतिष्ठापना केली .

तसेच तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून रात्री गौरी गणपतीची झिम्मा फुगडीसह विविध प्रकारची गाणी म्हणून रात्री करमणूक करण्यात आली . दरवर्षी महिलांच्यासाठी पारंपारिक गणपती विसर्जनापर्यंत कार्यक्रम असतो . गावातील सचिन देसाई व त्यांची वाजंत्री पथकाने गावातून सवाद्य मिरवणूक काढली .

error: Content is protected !!