संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी “प्रारंभ-२०२३” या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत शैक्षणिक संकुलनाच्या प्रांगणात संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. या वेळी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, ऍडमिशन सेलचे समन्वयक, प्रा. नितीन जाधव, कार्यक्रम समन्वयक, प्रा. मकानदार, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बेसिक सायन्स विभागाच्या विभाग प्रमुख, प्रा. सौ. शुभांगी महाडिक यांनी केले. त्यांनी आरंभ-२०१२ ते प्रारंभ-२०२३ पर्यंत प्रवास आणि सुरू झालेली संस्था लहानशा रोपट्यापासून ते आता वटवृक्षापर्यंत कशी बहरली संस्थेच्या या प्रवासातील महत्त्वाच्या वाटचाली अधोरेखित केल्या.
संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे आपल्या संस्थेत प्रवेश घेतल्याबद्दल शब्द सुमनाने स्वागत केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या शैक्षणिक धोरणानुसार मार्गदर्शक सूचना व श्रीयांक आराखडा या विषयी मार्गदर्शन करून शिक्षण पद्धतीमध्ये झालेले बदल, डिजिटल मीडियाचा प्रभावी उपयोग, योग आणि ध्यान साधना या विषयाचा अंतर्भाव, गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी, पालक आणि विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी निवडलेले करिअर आणि करिअर साठी असणाऱ्या आवश्यक गोष्टी, विद्यार्थ्यांचा मित्र परिवार, विद्यार्थी पालक शिक्षक यांचा संवाद, शिक्षण घेत असताना जीवन कौशल्य आत्मसात करण्याच्या पद्धती, या महत्वाच्या मुद्यावर डॉ. गिरी यांनी मार्गदर्शक करून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी निवडलेल्या करिअरला सक्सेस मिळून देण्याचा विश्वास दिला.
संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले यांच्या हस्ते इन्स्टिट्यूटच्या तंत्रनिकेतन विभागात प्रवेश घेतलेल्या कोल्हापूर विभाग एसएससी परीक्षे मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा आणि तिच्या पालकांचा व प्रथम पाच प्रवेश झालेल्या आणि एसएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विश्वस्त, विनायक भोसले मार्गदर्शन करताना म्हणाले संजय घोडावत इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ख्यातनाम संस्था आहेच पण येथे ज्ञानार्जन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जीवन मूल्य आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहोत.
या वेळी पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजीत शिरोडकर प्रा. आदित्य बुल्ले यांनी केले. आभार प्रा. गफुर मकानदार यांनी मानले.
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले यांनी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
