घोडावत विद्यापीठातर्फे ‘एसजी यु आयकॉन 2024’ जाहीर उद्या वितरण

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर ची उपस्थिती

संजय घोडावत विद्यापीठाकडून कडून दिला जाणारा एस जी यु आयकॉन पुरस्कार 2024 यावेळी राहुल व दीपक कदम, गिरीश चितळे, सुनंदन लेले डॉ.नाथानिएल ससे, कु.ऐश्वर्या जाधव,यांना जाहीर झाला आहे. संजय घोडावत यांच्या वाढदिवसानिमित्त 28 फेब्रुवारी रोजी घोडावत विद्यापीठात सकाळी 11 वा. याचे वितरण करण्यात येणार आहे.यावेळी बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर विशेष उपस्थितीत राहणार असल्याची माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.

  ते पुढे म्हणाले,की घोडावत विद्यापीठाकडून दरवर्षी संजय घोडावत यांच्या वाढदिनी कला,क्रीडा,साहित्य,संस्कृती, कृषी, उद्योग, वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या, समाजासाठी झटणाऱ्या खऱ्या हिरोंना 'एसजीयु आयकॉन' पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या अगोदर भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार स्मृती मानधना, पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, एमआयटी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मंगेश कराड,ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक अशा महत्त्वाच्या व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे.
  यावर्षी ज्येष्ठ नागरिकांची अविरत सेवा करणाऱ्या माऊली केअर सेंटरचे संस्थापक राहुल व दीपक कदम यांना समाजसेवेसाठी, उद्योग विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे व दुग्ध व्यवसायात शेतकरी वर्गाला न्याय देणारे चितळे समूहाचे गिरीश चितळे यांना उद्योजकतेसाठी, मेंदू विकार तज्ञ डॉ.नाथानिएल ससे यांना आरोग्य सेवेसाठी, क्रीडा पत्रकार समीक्षक सुनंदन लेले यांना क्रीडा पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी तसेच टेनिसपटू कु.ऐश्वर्या जाधव हिला उत्कृष्ट क्रीडापटू साठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, एसजीआयचे प्राचार्य डॉ.विराट गिरी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

संजय घोडावत यांचा 59 वा वाढदिवस 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या विविध कला गुण दर्शनाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उद्योजक,मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

युवकांचा आवडता अभिनेता अर्जुन कपूर याची संजय घोडावत यांच्या वाढदिवसा दिनी विशेष उपस्थिती असणार आहे.’ उमंग 2024′ विद्यार्थी कला महोत्सवाचे उद्घाटन यांच्या हस्ते होणार आहे. इशकजादे, गुंडे, का अँड की, नमस्ते लंडन,एक था विलन अशा चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!