डेंगीसदृश आजाराने दानोळीत बालिकेचा मृत्यू

दानोळी तालुका शिरोळ येथील मैथिली संतोष चंदोबा (वय ५) हिचा डेंगीसदृश आजाराने मृत्यू झाला. तिची लहान बहीण स्वरा हिलाही डेंगीसदृश ताप असल्याने सांगली येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मैथिलीला गुरुवारपासून ताप येत होता. गावात उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी उलटी झाली. ताप कमी येत नसल्याने सोमवारी तिला सांगली येथील खासगी स्रणालयात दाखल केले होते.

तिच्या रक्तातील प्लेटलेटस् झपाट्याने कमी होत होत्या. मैथिली चंदोबा सिव्हिलमध्ये खूप कमी झाला होता. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मध्यरात्री तिला सांगली दाखल करण्यात आले होते. तिचा आज सकाळी मृत्यू झाला. मैथिली अंगणवाडीत शिकत होती. तिच्या लहान बहिणीची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मैथिलीच्या जाण्याने चंदोबा कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे

error: Content is protected !!