खूशखबर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल 2 हजार घरांची ‘म्हाडा’ कडून सोडत

पुणे /प्रतिनिधी

 पुणे हाऊसिंग मंडळाच्या (Pune MHADA) वतीने ऐन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल 2 हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. लवकरच त्याची रितसर जाहिरात प्रसिद्ध होणार असून पुणे म्हाडाचे सीईओ नितीन माने पाटील यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

पुणे म्हाडाने गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2020 मध्ये तब्बल 5 हजार 657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांच्या हस्ते नुकतीच त्याची सोडतही काढण्यात आली होती. त्यापाठोपाठ आणखी 2 हजार घरांची जाहिरात पुणे म्हाडा लवकरच प्रसिद्ध करत आहे.

पुणे विभागातील पुणे शहर पिंपरी-चिंचवड सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मिळून तब्बल 2 हजार घरांची ही जाहिरात असणार आहे. यामध्ये म्हाडाच्या गृहप्रकल्पातील 600 सदनिका तर इतर घरेही बिल्डरकडील 20 टक्के कोट्यातील असतील. यापैकी एकट्या पुणे शहरात दीड हजार घरे ही पुणे शहरातील नामांकित बिल्डरांनी बांधलेल्या स्किममधील असणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना अगदी परवडणाऱ्या दरामध्ये ही घरे उपलब्ध होणार आहेत. पुणे म्हाडाचे सीईओ नितीन माने-पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

error: Content is protected !!