गारगोटीसह भुदरगड तालुक्यात संचारबंदीला चांगला प्रतिसाद

गारगोटी /आनंद चव्हाण
    कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या शासनाचे आदेशाचे गारगोटीसह भुदरगड तालुक्यात काटेकोर पालन करणेत आले. नेहमी गजबजलेल्या परिसरात आज काही मोजकीच दुकाने सुरू होती. त्यामुळे गारगोटी तसेच भुदरगड तालुक्यातील अनेक रस्त्यावर तुरळक रहदारी होती.
     कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीला काल रात्री पासून सुरुवात झाली. काल सायंकाळी लोकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती, काय चालू राहणार काय बंद राहणार याबद्दल लोकांमध्ये तसेच व्यापारी व दुकानदारामध्ये संभ्रम होता, त्यामुळे गोंधळात भर पडून बाजारासाठी गर्दी झाली.

गारगोटी येथे संचारबंदीमुळे आज क्रांती चौक ते एस टी स्टँड रस्त्यावर असा शुकशुकाट होता.

   आज गुरुवारी सकाळी किराणा दुकाने, बेकरी दुकाने सुरू राहिली, बरेच बझार सुरू राहिले, रस्त्यावर असणारी फळे विकणारे हातगाडे सुरू होते, पण गिऱ्हाईक नसलेने ते बसूनच होते, शाळा, महाविद्यालये बंदच राहिली, शासकीय कार्यालये ,बँका, पतसंस्था सुरू होत्या, पण म्हणावी तशी गर्दी नव्हती, रस्त्यावर सुद्धा तुरळकच रहदारी होती.

एस. टी. बस व रिक्षा बंदच

   शासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करणेस परवानगी दिली असली तरी पुरेसे प्रवाशी नसलेने बस वाहतूक बंदच होती,त्यामुळे बऱ्याचशा बसेस आगारामध्ये थांबून होत्या, वाहकचालक निवांत गप्पा मारत बसले होते, एस टी बस बंदचा परिणाम रिक्षा वाहतुकीवर झाला, प्रवाशी नसलेने रिक्षा बंदच होत्या, शिवाय स्टँड परिसरातील किराणा ,बेकरी दुकानांना गिऱ्हाईक नव्हते.

  भुदरगड पोलिसांचा बंदोबस्त संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी थांबून होते, पोलीस गाडीतून गर्दी टाळण्यासाठी व मास्क, सोशल डिस्टिंग पाळण्यासाठी स्पीकरवरून आवाहन केले जात होते.

संजय पतंगे यांच्या आवाजाची जरब आजही भुदरगड तालुक्याच्या कानावर

   भुदरगड पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार गेल्या वर्षी संजय पतंगे या डॅशिंग अधिकाऱ्यांकडे होता, त्यांनी तालुक्यातील अनेक अवैध धंदे, दारू अड्डे मोडीत काढले, अवैध धंद्याविरोधात कारवाई करताना त्यांनी कोणालाच जुमानले नाही, किंवा कोणाचा दबाव ही घेतला नाही.आणि त्यांच्याच काळात भारत सरकारने देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केले, सामान्य माणूस आयुष्यात पहिल्यांदाच अशा लॉकडाउनला सामोरा जात होता, परिस्थिती खूप जिकिरीची होती,
  पण संजय पतंगे यांची एम एच०९-३५२ क्रमांकाची सुमो पोलीस गाडी,आणि त्यातील स्पीकरवरून घुमणारा आवाज ऐकल्यानंतर रस्त्यावर आलेल्या अनेकांची घाबरगुंडी व्हायची. अगदी कोकणातल्या पश्चिमेकडील पाटगाव पासून पूर्वेच्या पिंपळगावपर्यंत आणि मुदाळ पासून मेघोलीपर्यंत या आवाजाची जरब त्यांनी निर्माण केली होती. आणि खऱ्या अर्थाने लॉकडाऊन यशस्वी केले होते, तालुक्यात मुंबईवाशी जास्त संख्येने असतांनाही तालुक्यात कोरोना संसर्ग कमी होण्यामध्ये अनेकांनी प्रयत्न केले असतील पण आग्रहाने संजय पतंगे यांचेच नाव तालुक्यात घेतले जातेय, त्यामुळे अनेक व्यक्ती आणि संस्था, संघटनांनी त्यांचा सत्कार केला होता.आज त्यांची आठवण सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृद्धापासून तरुणाईला सुद्धा येत आहे, भुदरगड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून अनेकजण आले आणि गेलेही पण आबालवृद्ध, तरुणाईच्या तोंडात नाव कायमचे लक्षात राहिले ते ते फक्त संजय पतंगे यांचेच. आज संचारबंदीच्या दिवशी बाजारात सहज बोलले जातेय, पतंगे साहेब पाहिजे होते…

error: Content is protected !!