सेंद्रिय गूळ प्रकल्पास माने (बापु) यांची सदिच्छा भेट …..

वडगांव / प्रतिनिधी

     उद्योगपती विनोद देसाई (भेंडवडे ता. हातकणंगले) येथील यांनी नव्याने सुरू केलेल्या देसाई अॅग्रो सेंद्रिय गूळ प्रकल्पास हातकणंगले तालुक्याचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

    यावेळी उद्योगपती विनोद देसाई यांनी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी सेंद्रीय गुळ आवश्यक असुन आपल्या निरोगी शरीरासाठी गुळाचे महत्व पटवुन सांगितले. तसेच गुळ बनविण्याची प्रक्रिया सांगितली.
     अशोकराव माने (बापु ) यांनी शुभेच्छा देताना सर्वत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . याप्रसंगी वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, संचालक दीपक पाटील, संचालक महेंद्र शिंदे, उपसरपंच डॉ संजय देसाई, ग्रा प सदस्य सुहास देसाई , सुनील पकाले, आर. डी. चव्हाणसर् ,अतुल पाटील, डी वाय कांबळे उपस्थित होते.

error: Content is protected !!